दोन पिस्तुलं, ८ जिवंत काडतुसेसह दरोड्याच्या तयारीत असलेले ७ गुन्हेगार अटकेत!

Breaking News Crime News Cyber Crime Latest News Political News Regional News

मिरारोड (पूर्व), पेणकरपाडा येथील सनशाईन हॉटेलजवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या सात सराईत गुन्हेगारांना खंडणी विरोधी पथकाने तडाखेबंद कारवाईत अटक केली. आरोपींकडून दोन देशी बनावटीची पिस्तुलं, ८ जिवंत काडतुसे, फायटर पंच, सुती दोर व मोबाईल फोन्स असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई दिनांक ०४ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ९.३० च्या सुमारास करण्यात आली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आरोपी महिंद्रा थार (MH-04-LJ-9080) व मारुती स्विफ्ट (MH-04-DS-5757) या दोन कारमधून पेणकरपाडा येथे दरोड्याच्या उद्देशाने जमले होते.पोलिसांनी पथके तयार करून सापळा रचला. या वेळी एका कारमधील तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून त्यांना अटक केली. दुसऱ्या कारमधील चौघांनाही ताब्यात घेण्यात आले. गुन्हयातील अटक आरोपींची नावे . रोहित खेमजीभाई वनकार ऊर्फ परमार, वय २३ वर्षे, रा. अधोई, पो. समखारी, ता.जि. कच्छ, राज्य गुजरात,२. प्रतिक कृष्णा भोईर, वय २६ वर्षे, रा. मु.पो. चांदिप, चांदिप हायस्कुल जवळ, ता. वसई, जि. पालघर,३. निरज ज्ञानेश्वर वेखंडे, वय २६ वर्षे, रा. निहालपाडा पो.आबीटघर, ता.वाडा, जि. पालघर,४. समीर नारायण पालवी, वय २९ वर्षे, रा. कळंबभोळ, पो.पडघा, ता. भिवंडी, जि. पालघर.,५. भावेश आत्माराम गवाळे, वय २४ वर्षे, रा. घर नं.६२, पंजाब नॅशनल समोर, मु.पो. मेट, वाडा, जि. पालघर,६. अमर मोहन शिर्के, वय ३० वर्षे, रा. मराठी शाळे जवळ, मु.पो. मेट, ता. वाडा, जि. पालघर,७. विजय दिनेश वारघडे, वय ३० वर्षे, रा. राधेशाम नगर के-२/०१, एन. एक्स सुमळ हॉटेल जवळ, कडूस, ता. वाडा, जि. पालघरयापैकी अनेक आरोपींवर यापूर्वीही खून, जबर मारहाण, चोरी, गुन्हेगारी कट यासारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत. या सर्वांविरुद्ध काशिमीरा पोलीस ठाण्यात IPC कलम 310(4)(5) व आर्म अ‍ॅक्ट 3, 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, ८ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त श्री. निकेत कौशीक, अपर पोलीस आयुक्त श्री, दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. संदीप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख, सपोनि /विलास कुटे, सपोनि / विजयेंद्र आंबवडे, पोउनि/ओंकार कोवे, सपोउनि. शकील पठाण, पो. हवा. मुस्तकिम पठाण, पोहवा. राजविर संधु, पो.हवा. राजाराम काळे, पोहवा. सुनिल गोमासे, पोहवा. शरद पाटील, पोहवा. अनिल नागरे, पोहवा. अकिल सुतार, पोअं. साकेत माघाडे तसेच सायबर पोलीस ठाणे, सपोउनि. संतोष चव्हाण यांनी यशस्वी कामगिरी केली आहे.

Police Batmi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *