अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर पथक यांनी कायदेशीररित्या परवानगी न घेता वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर केली धडक कारवाई.

Breaking News Crime News Latest News Political News

मिरारोड  : अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष,यांनी अनाधिकृतरित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर केली कारवाई. अधिकमाहितीनुसार दिनांक ०४/०५/२०२३ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिरारोड रेल्वे स्टेशनजवळील स्कायवॉक ब्रिज, अस्मीता व्हिन्टेज व शांतीपार्क, सेक्टर-६, उमाकांत मिश्रा चौक, नयानगर मिरारोड पुर्व या परिसरात अनाधिकृतरित्या वास्तव्यास असलेले बांगलादेशी नागरिक कामासाठी येतात.

मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदरचे पो.नि. श्री. समीर अहिरराव यांनी कायदेशीर बाबींची पुर्तता करुन पोलीस पथक, दोन पंच व दुभाषिक यांचेसह नयानगर पोलीस ठाणे हद्दीतील  नयानगर, मिरारोड पुर्व या ठिकाणी सापळा कारवाई करुन ०६ स्त्री व ०२ पुरुष असे एकुण ०८ बांगलादेशी नागरिकांना सकाळच्या दरम्यान ताब्यात घेतले .  पोलिसांनी त्यांची प्राथमिक विचारपूस केली असता ते पारपत्र व व्हीजा न बाळगता अनाधिकृतपणे भारतात आल्याचे व वास्तव्य करीत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांचे विरुध्द म.पोअं. अश्विनी भिलारे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन नयानगर पोलीस ठाणे गुन्हा रदाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.श्री. समीर अहिरराव, स.फौ. उमेश पाटील, विजय निलंगे, रामचंद्र पाटील, पो. अंम केशव शिंदे, म. पोअं. अश्विनी भिलारे, चा.पो.हवा. सम्राट गावडे व महिला म. सु. ब. शुभांगी मोकल सर्व नेमणुक अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर यांनी केली आहे.

Police Batmi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *