विदेशी कंपनीची दारू बेकायदेशीर वाहून नेतांन मोठ्या शिताफीने पोलिसांनी केली जप्त.

Breaking News Crime News Cyber Crime Latest News Political News

नायगाव : राष्ट्रीय महामार्गावर विनापरवाना वाहुन नेणारी विदेशी कंपनीची दारू  नायगाव पोलीस ठाणे यांनी केली जप्त . सविस्तर माहिती अशी कि नायगाव पोलीस ठाणे हद्दीतील जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरुन दिनांक ०४/०८/२०२३ रोजी एक सिल्व्हर रंगाची इनोव्हा कार  ही विनापरवाना विदेशी बनावटीची दारु ससुनवघर ते चिचोंटी फाटा असे मुंबई-अहमदाबाद हायवे वाहिनीने गुजरात राज्यात घेवुन जात असल्याची गुप्त माहिती नायगांव पोलिसांना मिळाली त्यानुसार नायगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मुंबई- अहमदाबाद हायवेवर सापळा रचुन वर नमुद इनोव्हा कार ताब्यात घेतली असता त्यामध्ये विदेशी दारुचा साठा व इसम मुन्ना व कार चालक यांना ताब्यात घेऊन सदर  छापा कारवाईमध्ये १) ४,००,०००/- रुपये किंमीतची एक सिल्व्हर रंगाचा इनोव्हा कार . २) ३१,०००/- रुपये किमतीची इम्पेरिअल ब्ल्यु कंपनीची सुपीरेअर ग्रीन व्हिस्कीचे २००० मिली मापाच्या प्रत्येकी १५५०/- रुपये किंमतीच्या एकुण २० बाटल्या असलेले प्लॉस्टीकची  गोणी. ३) १६,५००/- रुपये किमतीची ऑफीसर चाईस प्रीस्टेज व्हिस्कीचे १००० मिली मापाच्या प्रत्येकी ६६०/- रुपये किंमतीच्या एकुण २५ बाटल्या असलेले प्लॉस्टीकची  गोणी ४) १५,७५०/- रुपये किमतीचे BAGPIPER DELUXY WHISKY चे १००० मिली मापाच्या प्रत्येकी ६३०/- रुपये किंमतीच्या एकुण २५ बाटल्या असलेली प्लॉस्टीकची गोणी. ५) ३७,३००/- रुपये किमतीचे DSP BLACK DELUXY WHISKY चे २००० मिली मापाच्या प्रत्येकी १३५०/- रुपये किंमतीच्या एकुण २८ बाटल्या असलेले २ खाकी पुटयाचे बॉक्स.६) १५,०००/- रुपये किमतीचे MCDOWELLS NO 1 SUPREME SPECAIL WHISKY २००० मिली मापाच्या प्रत्येकी १५००/- रुपये किंमतीच्या एकुण १० बाटल्या असलेली १ खाकी पुटयाचे बॉक्स असा एकूण ५,१५,५५०/- रुपये असेलेला किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाई दरम्यान इनोव्हा कारमध्ये मिळुन आलेले  १) मुन्ना ऊर्फे मोहसीन अब्दुल कादर मावत वय-३६ वर्षे, राहणार – डी / २०३, आशा हाऊस, मालपालिया, मोटा, वराच्छा सुरज गुजरात.२)आरीफ दिलावर राठोड, वय-३१ वर्षे,राहणार-००१/ हौसिंग जी.आर.यु.सोसायटी, काश्मिरी कॉटर्स, कुंभारपाडा,भावनगर,गुजरात यांच्याविरुध्द पो. अं. सचिन मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नायगाव पोलीस ठाणे गुन्हा  गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वरील कामगीरी श्रीमती पौणिमा चौगुले पोलीस उप आयुक्त, परीमंडळ-२ वसई, श्रीमती. पदमजा बडे, सहाय्यक पोलीस आयुक्त वसई विभाग, नायगाव पोलीस ठाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रमेश भामे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. मिलींद साबळे, यांच्या  मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे, स. पो. नि. संतोष सांगवीकर, रोशन देवरे,पो.डा.निरी. विष्णु वाघमोडे, पो.हवा. देविदास पाटील नितीन जाधव पो. अंम. सचिन मोहीते, सचिन खताळ, जयवंत खंडवी,अमर पवार, चेतन ठाकरे, अशोक पाटील यांनी पार पाडली आहे.

Police Batmi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *