नालासोपारा – ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन २६ जानेवारी २०२६ रोजी ५,८०,०००/- रूपये किंमतीचे हरवलेले ५८ मोबाईल फोनचा शोध घेवुन तक्रारदारांना परत केले. तुळींज पोलीस ठाणेची उल्लेखनिय कामगिरी. अधिकमाहितीनुसार तुळींज पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात दाट लोकवस्तीचे तसेच गर्दीचे ठिकाणे असुन, दैनंदिन कामाचे घाईगडबडीमध्ये रेल्वे स्टेशन परिसर तसेच सेंट्रल पार्क, ओसवाल नगरी आठवडा बाजार दुबे इस्टेट, तुळींज ब्रिजखाली येथे लोकांचे मोबाईल फोन गहाळ झाल्या बाबत पोलीस ठाणे तसेच ऑनलाईन तक्रारी प्राप्त होत असतात. मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तुळींज पोलीस ठाणे इथे दाखल प्रॉपर्टी मिसींगमधील गहाळ मोबाईल फोन यांचा कौशल्यपूर्ण व तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेवुन, २६ जानेवारी २०२६ रोजी ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन, पोलीस ठाण्यात नाविण्यपूर्ण उपक्रम राबवुन विविध कंपन्यांचे एकुण ५,८०,०००/-रूपये किंमतीचे नागरिकांचे हरवलेले एकुण ५८ मोबाईल फोन तक्रारदार यांना मा. वरिष्ठांच्या हस्ते परत दिले आहेत. सदर बाबत तक्रारदार यांनी त्यांचा हरवलेला मोबईल फोन परत मिळाल्याने समाधान व्यक्त करून, पोलीसांचे कामगिरीचे कौतुक केले आहे.
सदरची कामगीरी मा. श्रीमती. पोर्णिमा चौगुले श्रींगी पोलीस उप आयुक्त, परीमंडळ-२ वसई, मा. श्री. उमेश माने पाटील, सहायक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग, तुळींज पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय जाधव, पोलीस निरीक्षक गुन्हे बाळासाहेब बनकर, पोलीस निरीक्षक (प्रशासन) आनंद पेंडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुनिल पवार, पोहवा/अशपाक जमादार, पांडुरंग केंद्रे, डिगांबर परजने, श्रीधर कांबळे, इस्माईल शाह छपरीबन, राहुल कदम, अक्षय झांजुनें, पोअंम / प्रसाद पालवे, प्रकाश दवने, अनिल सोनवणे, ज्योतीराज झंजे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
