नालासोपारा : ७,७५,०००/- रुपये किंमतीचा मेफॅड्रॉन नावाचा अंमली पदार्थासह सराईत आरोपीस अटक करण्यात नालासोपारा पोलीसांना यश .अधिक माहितीनुसार नालासोपारा पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थ, गुंगीकारक औषधीद्रव्ये विक्री बाबत जातीने लक्ष घालून कारवाई करण्याचे वरीष्ठांनी वारंवार सुचना दिल्या होत्या. या संदर्भाने दिनांक १६/१०/२०२३ रोजी स.पो.नि. अमोल तळेकर यांना गुप्त बातमीरामार्फत माहीती मिळाली की, एक इसम हनुमाननगर, नालासोपारा पश्चिम येथे रस्त्यावर एका बुलेट दुचाकीवर बसुन कोणतातरी अंमली पदार्थ विकत आहे. सदर बातमीचा आशय वरीष्ठांना कळवून त्यांनी दिलेल्या आदेशान्वये लागलीच कारवाई करण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक व दहशतवादी विरोधी पथकातील अधिकारी, अंमलदार यांनी सापळा रचून आरोपी यास त्याच्या ताब्यातील मोटार सायकलीसह शिताफीने पकडले.सदर इसम अत्तेशाम उर्फ इतेशाम उर्फ शाम रफीक अन्सारी, वय-४७ वर्षे , सदरची बुलेट ही त्याचीच असून सदर बुलेट दुचाकीच्या हॅन्डलला अडकवलेल्या काळया रंगाची सॅकची पाहणी केली असता त्यामध्ये एका पारदर्शक प्लास्टीक पिशवीत पांढऱ्या रंगाची पावडर व रोख रक्कम मिळुन आली. एका पारदर्शक पिशवीमध्ये मेफॅड्रॉन नावाचा अंमली पदार्थाची पांढऱ्या रंगाची पावडर एकुण वजन ७७.५० ग्रॅम मि.कि.सु.,भारतीय चलनातील नोटा ( ५००रु, २००, १०० रुपये दराच्या चलनी नोटा )एक काळपट हिरव्या रंगाची रॉयल एनफिल्ड कंपनीची क्लासीक ३५०सीसी | मोटार सायकल क्र एम. एच. ०२ / एफ. क्यु. ५१४२ अशा वर्णनाची जु. वा. किं.सु.१०,७५,५००/- रु. एकूण.मुद्देमाल मिळुन आल्याने त्याच्या विरुध्द सरकार तर्फे एन. डी. पी. एस. कायदा १९८५ चे कलम ८(क), २१(क) प्रमाणे फिर्याद दाखल करुन आरोपी यास दिनांक १७/१०/२०२३ रोजी अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.उप निरी. अख्तर शेख करीत आहेत.नमुद आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुध्द यापूर्वी नालासोपारा पोलीस ठाणे येथे ०५ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी श्री. मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, श्रीकांत पाठक, अपर पोलीस आयुक्त, सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०३, राजेंद्र मोकाशी, सहा. पो. आयुक्त नालासोपारा यांच्या मार्गदर्शनाखाली विजयसिंह बागल, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपार पोलीस ठाणे, सचिन कोतमिरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), स.पो.नि.पंडीत मस्के, अमोल तळेकर, पो.उप निरी. अख्तर शेख, वैभव पवार, पो. हवा. किशोर धनु, हिरालाल निकुंभ, प्रशांत साळुंके, पो.ना. अमोल तटकरे, पो. अं. बनसोडे, कल्याण बाचकर, आकाश पवार, प्रेम घोडेराव यांनी केलेली आहे.
