मिरा-भाईंदर – ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम रुपये १,०१,०८,५७६/- तक्रारदारांना परत करण्यात यश ( जानेवारी २०२३ रोजी ते ऑगस्ट २०२३ पर्यंत ) मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील सायबर गुन्हे कक्षाची कामगिरी. अधिक माहीतीनुसार मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस म.भा.व. वि पोलीस आयुक्तालय अंतर्गत सायबर विषयक तक्रारींची चौकशी व सायबर गुन्ह्यांच्या तपासाकरीता गुन्हे शाखा अंतर्गत सायबर गुन्हे कक्ष कार्यरत आहे.सायबर गुन्हे कक्ष येथे जानेवारी २०२३ रोजी ते ऑगस्ट २०२३ ( मागील ०८ महिन्याच्या कार्यकाळात) मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालयातील रहीवाशी नागरिकांकडून ऑनलाईन फसवणूकीच्या एकूण १९५२ तक्रारी अर्ज प्राप्त झाल्या होत्या. त्यांचे लवकरात लवकर निरसण करण्यासाठी त्या अर्जाची सायबर गुन्हे कक्ष यांनी तात्काळ दखल घेतली. फसवणूक झालेली रक्कम ज्या पेमेंट गेटवे / शॉपिंग वेबसाईट / गेमिंग वेबसाईट / बँक मध्ये वर्ग झालेली होती, त्यांचेशी तत्परतेने पत्रव्यवहार करून व वारंवार समन्वय साधुन ६५ तक्रारदार यांना ०१,०१,०८,५७६/- रुपये परत मिळवून देण्यात यश आलेले आहे. तक्रारदार यांना मोठया प्रमाणात न्यायालयीन प्रक्रीयेविना सदरची रक्कम सायबर गुन्हे कक्षाने वेळीच केलेल्या कारवाईमुळे परत मिळवून देण्यात सायबर गुन्हे कक्षास यश आले आहे.
ऑनलाईन फसवणूक झालेल्या तक्रारींमध्ये सर्वात कमी रक्कम ५०० रुपयाची होती. तरी देखील सायबर गुन्हे कक्षाकडून ऑनलाईन फसवणूकीची तात्काळ दखल घेण्यात येवून सदरची रक्कम तक्रारदार यांना परत मिळवून देण्यात आली तसेच ऑनलाईन फसवणूक झालेल्या तक्रारींमध्ये सर्वात जास्त रक्कम क्रिप्टो गुंतवणूकीच्या नावाने ( 39596USDT- †) 36,00,000/- Rs. (INR) रुपये इतकी फसवणूक झाली होती. त्या तक्रारीवर सायबर गुन्हे कक्षा सातत्यपुर्ण तपास करून तक्रारदार यांना ( 39596USDT- ₹) 36,00,000/- Rs. (INR) रुपये परत मिळवून दिलेली आहे. सायबर गुन्हे कक्ष यांनी यापुर्वी सन २०२२ मध्ये संपुर्ण वर्षभरात ऑनलाईन फसवणूक झालेल्या रक्कमेपैकी ९१,९४,८३३/- रुपये तक्रारदार यांना परत मिळवून दिलेले आहेत. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे सायबर गुन्हे कक्ष यांनी २०२३ मध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत ऑनलाईन फसवणूकीतील तक्रारदार यांची ०१ करोडपेक्षा जास्त रक्कम परत मिळवून दिलेली आहे.
सायबर गुन्हे कक्ष येथे प्राप्त होणा-या तक्रारीमध्ये प्रामुख्याने ऑनलाईन फसवणूकीबाबत पुढील प्रकारच्या तक्रारी प्राप्त होतात.
Electricity Bill Update, Bank Account KYC Update (Fraud SMS/Link), Google Searching (Fraud Customer Care Numbers). Work From Home – Like review task (Telegram, Instagram, Facebook adds), OLX Shopping, Selling or other Ways (QR Code Scanning for Payments.), Fraud Loan App Installing & Giving all Access Permission (Contact, Media, Location etc….), Facebook Messenger, What’s app nude video call for Extortion, Fake Crypto Currency investment webpage or app.अश्या प्रकारचे नागरिकांचे नुकसान होवू नये म्हणुन मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालय क्षेत्रात राहणाऱ्या नागरीकांना जाहीर आवाहन केले की, ऑनलाईन फसवणूकीचा प्रकार आपल्यासोबत सुध्दा होवू शकतो त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करतांना सतर्क राहावे. तसेच ऑनलाईन व्यवहार करताना आपली फसवणूक झाल्यास तात्काळ www.cybercrime.gov.in अथवा1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी. तात्काळ तक्रार नोंदविल्यास फसवणूक झालेली रक्कम थांबविण्यात व तक्रारदाराच्या मुळ खात्यात परत जमा करण्याची शक्यता जास्त असते. (Golden Hours..)
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. मधुकर पाण्डेय, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. श्रीकांत पाठक, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अविनाश अंबूरे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्हे कक्ष येथे नेमणूकीस असलेले सुजितकुमार गुंजकर, पोलीस निरीक्षक, स्वप्निल वाव्हळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक, प्रसाद शेनोळकर, पोलीस उपनिरीक्षक, स. फौ. संतोष चव्हाण, पो. अंम. प्रविण आव्हाड, गणेश इलग, म.पो.हवा. माधुरी धिंडे, म.पो. अं. सुवर्णा माळी, पल्लवी निकम, अमिना पठाण, पो.अं. कुणाल सावळे, पो.अं. प्रशांत बोरकर यांनी केली आहे.
