वालिव पोलीस ठाणे यांनी राष्ट्रीय महामार्गावर जबरी चोरी करणा-या आरोपीस केली अटक.

Crime News

नालासोपारा : राष्ट्रीय महामार्गावर जबरी चोरी करणा-या अरोपीस अटक वालीव पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.अधिक माहिती अशी कि दिनांक २१/०३/२०२३ रोजी रात्री ०२.०० वा. च्या  सुमारास फिर्यादी  मोहम्मद रिजवान मोहम्मद फारुख अन्सारी हे त्यांच्या ताब्यातील ओला कारने नालासोपारा फाटा येथुन गोल्डन चॅरिएट हॉटेल जवळ आले असता त्यांना अंदाजे २० २५ वर्षे वयोगटाचे दोन इसम भेटले व त्यांनी फाऊंटन येथे सोडण्यास सांगितले असता अन्सारी त्यांना घेऊन सातीवली ब्रिज जवळील सर्व्हिस रोडवर, सातीवली, वसई पूर्व येथे आले असता त्या दोन इसमांनी त्यांचा मित्र येत असल्याने गाडी बाजुला घेण्यास सांगितले. त्यानंतर अन्सारी याच्या  गाडीत बसलेल्या एका इसमाने पाठीमागुन अन्सारी यांचा  गळा पकडला व त्यांचा कडील असलेला चाकु अन्सारी याच्या  गळयाला लावला व दुसऱ्या इसमाने अन्सारी यांच्या  खिशातील एकुण २०,०००/- रु. रोख रक्कम काढुन घेतली व त्यातील ५०० /- रु. अन्सारी यांना परत देऊन पाठीमागुन आलेल्या एक लाल व काळया रंगाची डि.ओ. मोटार सायकल क्रमांक एम.एच.०५ बी. व्ही. ९०४२ यावर बसुन निघुन गेले. अन्सारी यांनी त्यांचा पाठलाग केला असता ते गुजरात मुंबई महामार्गावरील वासमाया ब्रिजजवळ दिसुन आल्याने अन्सारी यांनी आपली गाडी चोरांच्या मोटारसायकल समोर उभी केली असता चोरांनी अन्सारी यांच्या गाडीला ठोकर मारली त्यामुळे त्यांची  खाली पडली व ते मोटारसायकल सोडुन सदर ठिकाणाहुन पळुन गेले. सदरबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वालीव पोलीस ठाणेत गुन्हा  नोंद करण्यात आला होता.

वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-अहमदाबाद हायवेवर जबरी चोरीचे प्रमाणे वाढत असल्याने सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन वरिष्ठांनी केलेले मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे वालीव पोलीस ठाणे गुन्हेप्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळावरील बारकावे, तांत्रिक विश्लेषण, सिसिटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदार यांचेकडुन प्राप्त माहितीच्या आधारे आरोपी सरोज मारुफ आलम उर्फ सोनु, वय – २६ वर्षे, रा. धानीवबाग, नालासोपारा पूर्व यास अटक करुन तपास केला असता पाहीजे आरोपी आसीफ उर्फ मव्वा अकील अहमद, रा. धानीवबाग, नालासोपारा पूर्व रप अब्दुल उर्फ कट्टा रा. चौधरी कपांऊड, वाकणपाडा, नालासोपारा पुर्व याच्या   मदतीने गुन्हे केले असुन पाहीजे आरोपी यांनी वालीव पोलीस ठाण्याचे रेकॉर्डवरील आणखी १ गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. अटक आरोपीकडून  वर नमुद गुन्हयातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन त्यांचेकडुन १) वालीव पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ३२४ / २०२३ भा.द.वि.सं. कलम ३९२, ३४, २) वालीव पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १०५०/२०२२ भा. दं. वि.सं. कलम ३९२, ३४ अन्वये २ गुन्हे उघडकिस आणण्यात आले आहेत.

सदरची कामगिरी श्रीमती पोर्णिमा चौगुले – श्रींगी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २ वसई, श्री. चंद्रकांत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग यांचे मागदर्शनाखाली वालीव पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कैलास बर्वे, पो.नि. श्री. राहुलकुमार पाटील (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स. पो. नि. ज्ञानेश फडतरे, पो.हवा. मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, राजेंद्र फड, सतिष गांगुर्डे, पो.ना. बाळु कुटे, पो. अंम. गजानन गरीबे, अभिजीत गढरी यांनी केली आहे.

 

 

Police Batmi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *