नायगाव : चोरी झालेले ३०,३०० टन कच्चे बेस ऑईल पैकी २७ टन (२७ लाख रुपये किंमतीचा ) कच्चे बेस ऑईल हस्तगत करुन तक्रारदार यास परत करण्यास नायगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश. अधिक माहिती नुसार नायगाव पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल झाली होती कि दि. ३०/८/२०२३ ते दि. ३१.०८.२०२३ रोजी क्रांत रोडवेज चे मालक सुजीत अभिराम झा रा. वर्धमान वाटीका, तत्वज्ञान विद्यापिठ ठाणे पश्चिम यांनी कच्चे बेस ऑईल घेऊन जाणारा टँकर चालक बिर्जेश यादव याच्या सोबत संगनमत करुन रोझरी बायोटेक लिमिटेड,कांजूरमार्ग यांच्या द्वारे तक्रारदार यांच्या मागणीप्रमाणे विक्रांत रोडवेज कडील टँकरनं. मधून पाठविलेला ३०,५६,९६७ /- रुपये किंमतीचा ३०,३०० मेट्रीक टन कच्चे मटेरियल (बेस ऑईल) या मालाचा मधेच अपहार केला याबाबत १) सुजीत अभिराम व २) बिर्जेश यादव याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यांच्या तपासाच्या अनुषगांने तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तसेच गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहीतीच्या आधारे चोरीस गेलेले कच्चे मटेरियल (बेस ऑईल) पैकी एकुण २७ टन (२७ लाख रुपये किंमतीचा) कच्चे मटेरियल (बेस ऑईल) पोलिसांनी हस्तगत केले असून तो माल फिर्यादी यांना परत केला आहे. नमुद गुन्हयातील चोरीस गेलेल्या मालापैकी ९० टक्के माल हा हस्तगत करण्यात नायगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश मिळाले आहे.
हि कामगीरी श्रीमती पौणिमा चौगुले पोलीस उप आयुक्त, परीमंडळ – २ वसई, श्रीमती. पदमजा बडे, सहाय्यक पोलीस आयुक्त वसई विभाग, नायगाव पोलीस ठाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रमेश भामे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. सागर टिळेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे,स.पो.नि.रोशन देवरे, स.पो.नि.गणेश केकान, पो. हवा. देविदास पाटील, पो. अंम. सचिन मोहीते, सचिन खताळ, जयवंत खंडवी,अमर पवार, चेतन ठाकरे,अशोक पाटील यांनी यशस्वीरित्या कामगीरी पार पाडली आहे.
