भाईंदर : जबरी चोरी व घरफोडी करणाऱ्या आरोपीस अटक करुन ५ गुन्हयांची उकल. नवघर पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.अधिक माहितीनुसार आदर्श इंदिरानगर चाळ गल्ली नं ०३, एस. एन. कॉलेज रोड, भाईंदर पूर्व येथे राहणारे राहुल ओमप्रकाश हरिजन, वय २४ वर्षे,हे दिनांक १३/०५/२०२३ रोजी सकाळी ०३.०० वा.चे सुमारास त्यांच्या घरात झोपलेले असताना एक २५ ते ३० वर्षे वयोगटातील अनोळखी इसम हा त्यांच्या घराच्या दरवाजाची कडी तोडुन आतमध्ये आला व त्याने फिर्यादी यांचा मोबाईल फोन चोरी केला त्याचवेळी फिर्यादी यांना जाग आली व त्यांनी चोरी करणा-या इसमास पाहीले असता त्यांना त्याच्या हातात त्यांचा २०,०००/- रुपये किंमतीचा ओपो कंपनीचा एफ १९ प्रो मोबाईल फोन दिसला. त्यावेळी फिर्यादी यांनी त्याच्या हातातुन त्यांचा फोन काढुन घेतला. सदरवेळी आरोपीने फिर्यादी यांच्या हातातुन त्यांचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावुन घेवुन त्यांना धक्का देवुन खाली पाडले व तेथुन तो पळुन जाताना फिर्यादी यांनी त्याचा पाठलाग केला मात्र तो त्यांना कोठेही मिळुन आला नाही. त्यानंतर फिर्यादी यांनी घरी येवुन पाहीले असता त्यांचा पॅन्टच्या खिशातील रोख रक्क्म ५,०००/- रुपये ही त्यांना त्यांच्या पॅन्टच्या खिशात मिळून आली नाही. सदर घटनेबाबत राहुल ओमप्रकाश हरिजन यांनी अनोळखी आरोपीविरुध्द नवघर पोलीस ठाणेस दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरीता वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांनुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाच्या घटनास्थळी व आजुबाजूच्या परिसरात गुन्हा उघडकीस आणण्याकरीता तांत्रिक व गोपनीय माहिती प्राप्त करुन गुन्हयातील आरोपी हा विवेक विश्वनाथ तोरडे, वय २६ वर्षे, व्यवसाय रिक्षाचालक, रा. इंदिरानगर झोपडपटटी, भाईंदर – पुर्व, ठाणे असल्याचे निष्पन्न करुन त्यास नमुद गुन्हयात दिनांक १३/०५/२०२३ रोजी अटक केली. अटक आरोपीकडे त्याच्या पोलीस कोठडी दरम्यान तपास करुन त्याच्याकडून त्याने वेगवेगळया ठिकाणाहुन चोरी केलेले ७०,०००/- रुपये किंमतीचे एकुण ०९ मोबाईल फोन व रोख रक्कम रु.५०००/- असा एकुण ७५,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल व गुन्हा करण्याकरीता वापरण्यात आलेले हत्यार असा मुददेमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे
सदरची कामगिरी श्री. जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०१, श्री. डॉ. शशीकांत भोसले, सहायक पोलीस आयुक्त, नवघर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. विजय पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, श्री. सुशिलकुमार शिंदे, पोलीस निरीक्षक ( गुन्हे ), सपोनि योगेश काळे, पोउनि प्रमोद पाटील, अभिजित लांडे, पोह. भुषण पाटील, सुरेश चव्हाण, नवनाथ घुगे, पोशि. ओंकार यादव, सुरजसिंग घुनावत यांनी केलेली आहे.
