मिरा भाईंदर – महसुल विभागाने जप्त केलेला ४० लाख रूपये किंमतीचा हायवा ट्रक चोरणारे आरोपी गजाआड, गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष १ यांची कामगिरी.अधिक माहितीनुसार दिनांक १४/०२/२०२६ रोजी अपर तहसिल कार्यालय, मिरा भाईंदर येथील नायब तहसिलदार श्री. प्रथमेश बबन भुर्के यांनी घोडबंदर येथे गस्त घालत असताना, बेकायदेशीररित्या गौण खनिजाची वाहतूक करणारा एक टाटा कंपनीचा हायवा ट्रक कारवाई करून जप्त केला होता. पुढील कारवाईसाठी सदर ट्रक अपर तहसिल कार्यालय, भाईंदर (प.) येथील सार्वजनिक रस्त्यावर उभा करून ठेवण्यात आला होता. दिनांक १४/०२/२०२६ ते १७/०२/२०२६ या कालावधीत कोणीतरी अज्ञात इसमाने सदरचा ट्रक आणि त्यातील १८,००० रुपये किमतीची ९ ब्रास गौण खनिज माती असा एकूण ४०,१८,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी करून नेला. या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गंभीर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून मा. वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष १ कडून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू करण्यात आला. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने आरोपी १) मांगीलाल तुलसिरामजी प्रजापती, वय ५७ वर्षे, धंदा चालक, राहणार मुळगाव नयापुरा, तहसिल पचपुदरा, जि. बालोदरा, राजस्थान व २) इशाक मुसा शेख, वय ४० वर्षे, धंदा सुपरवायझर, राहणार ठाकुर मॉलच्या मागे, गावठाण, काशीमिरा, मिरारोड पूर्व, जि. ठाणे यांना वाहनासह नीलकमल नाका, काशिगाव येथून शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपींकडे सखोल चौकशी केली असता, त्यांनी ट्रक मालक दशरथ मुरगेशन मुदलीयार याच्या सांगण्यावरून सदर चोरी केल्याचे स्वेच्छेने कबूल केले. आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरीला गेलेला ४०,००,०००/- रुपये किमतीचा १२ टायर टाटा हायचा ट्रक जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. श्री निकेत कौशिक, पोलीस आयुक्त, मा. श्री. दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री संदिप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त (प्रकटीकरण) श्री. मदन बल्लाळ आणि गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष १ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, स.पो.नि. सचिन सानप, योगेश काळे, पो.उ.नि. उमेश भागवत, स.फी./अशोक पाटील, संजय शिंदे, अविनाश गर्जे, पुष्पेंद्र थापा, संतोष लांडगे, पो.ह.वा/ मनोज चव्हाण, प्रशांत विसपुते, सचिन हुले, सुधीर खोत, पो.शि / धिरज मॅगाने, सौरभ इंगळे, गौरव बारी, लकी पवार व मसुब किरण आसवले यांनी केली आहे.हुले, सुधीर खोत, पो.शि / धिरज मॅगाने, सौरभ इंगळे, गौरव बारी, लकी पवार व मसुब किरण आसवले यांनी केली आहे.
