नायगाव – वाहन चोरी करणा-या सराईत गुन्हेगारांकडुन ३ गुन्हयांची उकल करण्यात गुन्हे शाखा कक्ष- २ वसई यांना यश. मिळालेल्या माहीतीनुसार सौ.श्रृती शशिकांत भोसले, वय ३८ वर्षे, व्यवसाय : गृहिणी, राहणार रुम नं. ५०८ एच – विंग ग्लोबल अरेना सनटेक नायगाव पुर्व, तालुका वसई, ता. वसई, जिल्हा पालघर यांची दिनांक ०९/०२/२०२४ रोजी सकाळी ०९.४५ वा. ते सायंकाळी ०७.०० वा. च्या दरम्यान नायगाव रेल्वे स्टेशन ब्रीजच्या रस्त्यावर, नायगाव पुर्व येथे सार्वजनिक रोडच्या कडेला उभी केलेली २०,००० /- रुपये किंमतीची होन्डा कंपनीची लाल रंगाची ऍक्टीव्हा ३ ही कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नायगाव पोलीस ठाण्यात दि. १०/०२/२०२४ रोजी सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये सतत होणा-या वाहन चोरींचे प्रमाण वाढत असल्याने सदर वाहन चो-यांवर आळा घालण्याबाबत मा. वरीष्ठांनी पोलीस पथकास सुचित केले होते. त्या अनुषंगाने घडणा-या प्रत्येक वाहन चोरीच्या गुन्हयाचे ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून घटनास्थळावरील सी सी टी व्ही फुटेजचे परीक्षण गुन्हे शाखा कक्ष -२ वसई यांचे मार्फतीने करण्यात येत होते. त्याप्रमाणे नायगाव पोलीस ठाणे येथील गुन्हयाच्या घटनास्थळी भेट देवून घनास्थळाच्या आजूबाजूच परीसराचे सी सी टी व्ही कॅमेरांचे फुटेज पडताळुन सदर चोरीची मोटार स्कुटी ही चालवून नेणा-या दोन अनोळखी चोरटयांचे सी सी टी व्ही फुटेज प्राप्त करण्यात आले. प्राप्त फुटेजचा माग काढुन फुटेज मधील अनोळखी चोरटयांचे नावाची गुप्त बातमीदाराकरवी उकल करुन १) राहुल सुर्यकांत दळवी वय २७ वर्ष रा. श्रीप्रस्था ओमसाई हाईट्स, फेज-२, रुम नं ७०१, नालासोपारा पश्चिम २) राहूल लल्लूराम गुप्ता वय २८ वर्ष रा. शिवशक्ती बिल्डींग, रुम नं ३०४, समेळ पाडा, नालासोपारा पश्चिम यांना सापळा रचुन ताब्यात घेण्यात आले.आरोपी यांच्याकडे केलेल्या तपासादरम्यान आरोपींनी वाहन चोरीचे २ व मोबाईल चोरीचा १ असे ३ गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले आहे.अटक आरोपी यांच्याकडुन उघडकीस आणलेल्या वाहन चोरी व मोबाईल चोरीच्या गुन्हयांमध्ये २ मोटार स्कुटी व १ मोबाईल असा एकुण ५०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.तसेच नमुद अटक आरोपी हे दुखपतीसह जबरी चोरी व वाहन चोरीचे गुन्हयातील गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेले सराईत गुन्हेगार असुन त्यांच्या विरोधात १.तुळींज पोलीस ठाणे,२.नालासोपारा पोलीस ठाणे(०२ गुन्हे) नोंद आहेत.
सदरची कारवाई मा.श्री अविनाश अंबुरे पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मा. श्री. मदन बल्लाळ सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा – २ वसई युनीटचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सपोनिरी/ सुहास कांबळे, सागर प्रकाश शिंदे, सहा. फौज. रमेश भोसले, संजय नवले, पो. हवा. रविंद्र पवार, प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, दादा आडके, सुधीर नरळे, पो. अं. अमोल कोरे, चौधरी सर्व नेम- गुन्हे शाखा – २ वसई, यांनी केली आहे.
