भाईंदर पुर्व- नवघर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी भरवस्तीत धाडसी जबरी चोरी करणाऱ्या आरोपीस केले १२ तासांत जेरबंद. अधिक माहितीनुसार नवघर पोलीस ठाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. नमुद गुन्हयातील फिर्यादी श्रीमती कोकीला कुंजबिहारी पांडे, वय ६० वर्षे, ह्या जेष्ठ नागरीक महिला दि. १३/०२/२०२६ रोजी रात्रौ ०८.०० वा. च्या सुमारास सिध्दीविनायक बिल्डींग नंबर ०२, तलाव रोड, भाईंदर पूर्व ता. जि. ठाणे येथील त्यांच्या राहत्या घराच्या पहिल्या मजल्यावर आल्या असता अनोळखी इसम, वय २० ते २५ वर्षे, याने पाठीमागून येवून फिर्यादी यांचे गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्ती ने खेचली असता फिर्यादी यांचे गळ्यातील सोन्याची चैन तुटुन खाली पडली त्यावेळी फिर्यादी यांनी आरडा-ओरडा केला व त्यामुळे सदरचा अनोळखी इसम हा पळून गेला असल्याबाबतचा व्हीडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता व सदर बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वर नमुद प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा जबरी चोरीचा प्रयत्नाचा गंभीर स्वरुपाचा असल्याने सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून तात्काळ सदरची माहिती मा. वरिष्ठांना देवुन मार्गदर्शनाखाली गुन्हयाचा तपास सुरु करुन एकूण २३ सी सी टी व्ही कॅमेरे तपासले व तांत्रिक परीक्षणाच्या आधारे नमूद गुन्हा इरफान हबीब मन्सुरी, वय २० वर्षे, याने केल्याची माहिती प्राप्त झाली त्यावरुन त्याचा शोध घेवून त्यांस ताब्यात घेवून तात्काळ सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. निकेत कौशिक, पोलीस आयुक्त, मि. भा. व. वि. पोलीस आयुक्तालय, मा. श्री. दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. राहुल चव्हण पोलीस उप आयुक्त, परिमंडळ१, मा. श्री. सोहेल शेख, सहा. पो. आयुक्त, नवघर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली धिरज कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, पोनि/दत्तात्रय ढुमे (गुन्हे), तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि/अमोल तळेकर, पोउनि/संपत आहेर, सफी/जयप्रकाश जाधव, सफौ/मधुकर सावंत, पोहवा/ संतोष पाटील, पोहवा/ भुषण पाटील, पोहवा/ सुरेश चव्हाण, पोहवा/ नवनाथ घुगे, पोहवा / सुरजसिंग घुणावत, पोहवा / ओंकार यादव, पोशि/ संकेत मगर, पोशि/नवनाथ पवार, पोशि/ उमेश अस्वार यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि/अमोल तळेकर करीत आहे.
