मोबाईल टॉवर बॅटरी चोरी प्रकरण उघड; गुन्हे प्रकटीकरण पथकाची यशस्वी कारवाई.

Breaking News Crime News Cyber Crime Latest News Political News Regional News

नायगाव – मोबाईल टॉवरची बॅटरी चोरी करणाऱ्या आरोपीस अटक नायगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.अधिकमाहितूनसार नायगाव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ०१/०१/२०२६ रोजी पहाटेच्या सुमारास इंन्डस टावर लिमिटेड कंपनी चिचोटी फाटा नायगाव पूर्व, ता. वसई, जि. पालघर याठिकाणी इंन्डस टावर लिमिटेड कंपनी या कंपनीच्या मोबाईल टॉवरची एकुण २४ बॅटऱ्या अंदाजे २४,०००/- रुपये किंमतीची कोणत्या तरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय स्वतःच्या फायद्या करीता लबाडिच्या ईराद्याने चोरुन नेल्याबाबत तक्रार केल्याने नायगाव पोलीस ठाणे गुन्हा रनोंद करण्यात आला होता.

सदर प्रकरणाची गंभीर्याने दखल घेवुन मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे दोन वेगवेगळे पथके बनवुन गुन्हयाचा कौशल्यपूर्ण तपास करुन मिळालेल्या माहितीच्या आधारे इसम  १) तौसीफ हबीब शेख, वय ३६ वर्षे, राहणार हनुमान मंदिराजवळ, शिवडी क्रॉस रोड, शिवंडी, मुंबई व २) मोहम्मद अरबाज हनीफ शेख, वय-२५ वर्षे, राहणार- लालुबाई कॅम्पाऊण्ड, गोवंडी, वडाळा मुंबई ३) हुसेन नुरमोहम्मद सय्यद, वय-३२ वर्षे,  राहणार- बेगनवाडी, गोवंडी, मुंबई यांना मुंबई गोवंडी परिसरातुन ताब्यात घेवुन त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने कौशल्यपुर्ण चौकशी केली असता, त्यांनी नायगाव पोलीस ठाणे येथे नोंद असलेल्या ०२ गुन्हयाची कबुली दिल्याने त्यांच्याकडुन गुन्हयातील २०,०००/- रोख रक्कम व गुन्हा करतेवेळी वापरलेली ५,००,०००/- रुपये किंमतीची वॅगनर कार जप्त करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी मा. श्री. निकेत कौशिक, पोलीस आयुक्त, मा. श्री. दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त, मा. श्रीमती पौणिमा चौगुले पोलीस उप आयुक्त, परीमंडळ २ वसई, श्री नवनाथ घोगरे, सहायक पोलीस आयुक्त वसई विभाग, नायगाव पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय हजारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विजय कदम यांच्या  मार्गदर्शनाखाली सपोनि/गणेश केकान, पोउपनिरी/ज्ञानेश्वर आसबे, पोहवा /शेखर पवार, सचिन ओलेकर, सचिन मोहीते, पो.अंम. चेतन ठाकरे, सचिन खंताळ, अमर पवार, अशोक पाटील, पांडुरंग महाले सर्व नेमुणक नायगाव पोलीस ठाणे व पोहवा/अमोल बरडे नेमुणक पोलीस उप आयुक्त सोो परिमंडळ क्र. ०२, वसई यांनी यशस्वीरित्या कामगिरी पार पाडली आहे.

Police Batmi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *