काशिमिरा – घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला २४ तासाच्या आत जेरबंद करण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-१, काशिमिरा यांना यश.अधिक माहिती नुसार फिर्यादी श्री. मोईन ईजाज खान यांच्या राहते घरामध्ये दिनांक २४/१०/२०२५ रोजी दरम्यान एका अज्ञात चोरट्याने खिडकीवाटे घरामध्ये प्रवेश करून घरातील अंदाजे रु. ०२,१३,५००/- किंमतीचे सोने-चांदिचे दागिने, मोबाईल फोन च रोख रक्कम चोरी केली म्हणून तक्रार दिल्याने नयानगर पोलीस ठाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मा. वरीष्ठांचे आदेशाप्रमाणे नमुद दाखल गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-१, काशिमिरा हे करीत असताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कौशल्यपुर्ण तपास करुन आरोपी यास निष्पन्न केले व गुप्त बातमीदारांकडुन त्याच्या ठावठिकाणाबाबत माहीती प्राप्त करून आरोपी बहरूल नुर इस्लाम तरफदार, वय २६ वर्षे, रा. भाईदर फीरस्ता. मुळ रहीवाशी गाय भदुराई, जि. २४ परगना, राज्य पश्चिम बंगाल यास पोलीस पथकाने भाईंदर पश्चिम येथुन शिताफीने ताब्यात घेतले आहे.आरोपी विरुद्ध १.नयानगर पोलीस ठाणे,२.नवघर पोलीस ठाणे(एकूण ३ गुन्हे) असे एकूण ४ गुन्हे नोंद आहेत . आरोपी यास पुढील कायदेशीर कार्यवाहीकामी नयानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. निकेत कौशिक, पोलीस आयुक्त, मा. श्री. दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त मा. श्री. संदिप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मा. श्री. मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रकटीकरण) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-१, काशिमीरा येथील प्रभारी पो.नि. सुशिलकुमार शिंदे, स.पो.नि. सचिन सानप, पो.उ.नि. उमेश भागवत, पो.उ.नि. संदिप शिंदे, स.फौ. अशोक पाटील, अविनाश गर्जे, संजय शिंदे, संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, संतोष चव्हाण, पो.ह. मनोज चव्हाण, सचिन हुले, सुधीर खोत, स्वप्निल मोहीले, प्रशांत विसपुते, पो.शि./ धीरज मॅगाणे, सौरभ इंगळे, गौरव बारी व म.सु.ब. किरण आसवले यांनी केली आहे.
