पालघर – अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थाची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर कारवाई करून एकूण २३,५३,४८८/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांची कारवाई.अधिक माहितीनुसार पोलीस अधीक्षक पालघर श्री. यतिश देशमुख यांनी पालघर जिल्हयातील अवैध धंदयावर कारवाया करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांना सक्त सुचना दिलेल्या होत्या. दिनांक ०४/१०/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, पालघरचे पोलीस पथक यांना गोपनीय बातमी मिळाली की, एका टाटा कंपनीच्या इंद्रा पिकअप यामधून गुजरात राज्यातून मुंबईकडे अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होणार आहे. नमूद माहितीच्या आधारे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवरील मौजे चिल्लार फाटा, मनोर, ता. जि. पालघर येथे पोलीस पथकाने सापळा लावला असता टाटा कंपनीचा इंट्रा पिकअप येत असताना दिसून आला. सदर पिकअप वरील चालकास वाहन बाजूला घेण्यास सांगून त्यास नाव पत्ता विचारले असता त्यांनी आपले नाव मोहम्मद इब्रान मोहम्मद रुस्तुम अन्सारी, वय ३० वर्षे व्यवसाय चालक सध्या रा. रावजीनगर, सखाराम यांची बिल्डींग, ४ था माळा, कल्याण रोड, भिवंडी ता. भिवंडी जि. ठाणे, मुळ रा. ग्राम- मिरपुर ता. लाईनबाजार, पोलीस ठाणे चौकींया, जि. जोनपुर राज्य उत्तदप्रदेश असे सांगितले. नमुद पिकअपमध्ये चेक केले असता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला एकूण १७,५३,४८८/- रुपये किंमतीचा सुगंधी पान मसाला असा तंबाखुजन्य अन्नपदार्थ साठा हा अहमदाबाद, गुजरात येथुन भरुन तो नाव्हा शेवा, मुंबई येथे वाहतुक करुन घेवुन जात असताना मिळून आला. त्यामुळे वाहनासह एकूण २३,५३,४८८/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नमूद आरोपींविरूध्द मनोर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक केले असून पुढील तपास हा पोउपनि/रविंद्र वानखेडे, नेम. स्थानिक गुन्हे शाखा, पालघर हे करत आहेत.
सदरची कारवाई ही श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि/प्रदिप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, पोउपनि/रोहित खोत, पोहवा/संजय धांगडा, पोना/कल्याण केंगार, पोअं/संदिप राजगुरे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी केली आहे.
