मिरा-भाईंदर– ६ ईसमांकडुन ५०१.६ ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ व इतर असा १,०६,२८,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त अंमली पदार्थ विरोधी कक्ष-१ यांची कारवाई. अधिक माहितीनुसार दिनांक ०४/०७/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक कक्ष ०१ चे पथक गस्त करीत असताना वेस्टर्न हॉटेल ते कनकिया कडे जाणाऱ्या मिरा-भाईंदर लिंक रोड वर स्केअर बिल्डींग समोर ०६ इसमांच्या संशयितरित्या हालचाली दिसुन आल्याने दोन पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेण्यात आली. त्यांचेकडुन ५०१.६ ग्रॅम वजनाचा रुपये १,००,३२,०००/- किं.चा मॅफेड्रॉन (एम.डी.) तसेच अंमली पदार्थ व्यवसायाकरिता वापरलेले ८ मोबाईल, ४ मोटारसायकल असा एकूण १,०६,२८,०००/- रुपये किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर बाबत काशिगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला असुन सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा तपास अंमली पदार्थ विरोधी पथक कक्ष ०१ मार्फत करण्यात येत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. निकेत कौशिक, पोलीस आयुक्त, मा. श्री. दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. संदिप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मा. श्री. मदन बल्लाळ, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्ष १ चे पथकामार्फत करण्यात आली आहे.
