सायबर पोलिसांची मोठी कामगिरी: बनावट शेअर ट्रेडिंग अ‍ॅपमध्ये फसवलेले ₹२८.१० लाख तक्रारदारास परत!

Breaking News Crime News Cyber Crime Latest News Political News Regional News

Fake Share Trading App मध्ये गुंतवणुक करुन फसवणुक झालेली रूपये २८,१०,५९३/-रक्कम तक्रारदार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश.

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रातील उत्तन सागरी पोलीस ठाणेचे हद्दीत राहणारे तक्रारदार  श्रीमती. दिव्या यांनी सोशल मिडीया टेलीग्राम अॅपवर Online Share Trading ऍप मध्ये गुंतवणुक करुन नफा मिळत असल्याबाबत जाहिरात पाहिली. तक्रारदार यांनी सदर ऍप मध्ये गुंतवणुक केली. परंतु त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही. त्यानंतर त्यांची आर्थिक फसवणुक झाल्याचे लक्षात आल्याने सायबर पोलीस ठाणे येथे तक्रारी अर्ज सादर केला. सदर तक्रारी अर्जाबाबत तात्काळ नोंद घेवुन ऑनलाईन NCCRP Portalअन्वये देखील नोंद घेण्यात आली.

तक्रारदार यांची ऑनलाईन NCCRP Portal वर तक्रार नोंदविल्याने फसवणुकीची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये थांबविण्यात आली. तसेच फसवणुकीच्या व्यवहाराचे अनुषंगाने अधिक तपास करुन तक्रारदार यांची रक्कम वर्ग झालेल्या बँक खात्यांची माहिती प्राप्त करुन संशयीत १५ बँक खात्यांना वारंवार पत्रव्यवहार करुन रक्कम ०८ बँक खात्यात रक्कम थांबविण्याबाबत कारवाई करण्यात आली.सदरची ०८ वेगवेगळ्या बँक खात्यांमधील रक्कम परत मिळविण्याकरीता मा. न्यायालयामध्ये अर्ज सादर करण्याबाबत तक्रारदार यांना सुचना देण्यात आल्या. तक्रारदार यांनी त्यांची फसवणुकीची रक्कम परत मिळविण्याकरीता मा. न्यायालयात याचिका सादर केलेली, त्याबाबत सायबर पोलीस ठाणे यांनी मा. न्यायालयामध्ये सविस्तर अहवाल सादर केला व मा. न्यायालयाचे आदेश प्राप्त केले.अश्याप्रकारे सायबर पोलीस ठाणे यांनी ०८ बँकेसोबत सातत्याने ०५ महीने पाठपुरावा करुन तक्रारदार यांची फसवणूक झालेली रक्कम २८,१०,५९३/- रूपये त्यांचे मुळ खात्यात परत मिळविण्यात आलेली आहे.

तक्रारदार यांची रक्कम परत मिळविण्यात आलया नंतर रक्कम परत केल्याबाबत तक्रारदार यांचे प्रतिनिधी यांना प्रतिकात्मक चेक देवून माहिती देण्यात आलेली आहे.

फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी…

सोशल मिडीया वरील Telegram Channel, Facebook Instagram यावर दाखविण्यात येणा-या Promotional Adds वर विश्वास ठेवु नका. याद्वारे आर्थिक फसवणुक करण्यात येत आहे.

Investment Online App, Share Market Trading Online App मध्ये गुंतवणुक करण्यापुर्वी ऍप ची पडताळणी केल्याशिवाय गुंतवणुक करु नये.

Crypto Investment, Mutual Funds मधील गुंतवणुक करण्याअगोदर आपल्या वितीय सल्लागारासोबत चर्चा करुनच गुंतवणुक करा.

जास्त परतावा देण्याचे आमिष दाखविणा-या कोणत्याही Online Website/App/APK files ऍप वर विश्वास ठेवु नये.

अश्या प्रकारच्या फसवणुकीमध्ये Telegram Channel, Watsapp Group वर ऍड करुन तेथे इतरांना कसा फायदा होत आहे याचे Sceenshot, Massages दाखवुन पैसे गुंतवणुक करण्यास प्रवृत केले जाते. गुंतवणुकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी सेबीची बनावट प्रमाणपत्रे दाखवुन फसवणुक करण्यात येते. एकदा गुंतवणुकदारांचा विश्वास जिंकला की, हे लोक गुंतवणुकदारांना जास्त व खात्रिशिर परताव्याची हमी देतात. अशा गुंतवणुकीमध्ये आर्थिक फसवणुक होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो.

आपली वैयक्तिक तसेच आर्थिक व्यवहारासंदर्भात माहिती कोणासही उघड करु नये.

ऑनलाईन फसवणुक झाल्यास तात्काळ बँकेला संपर्क करावा.

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, सायबर विषयक तक्रारी किंवा ऑनलाईन फसवणूकीबाबतची तक्रार तात्काळ सायबर हेलपलाईन क्रमांक 1930 And/Or 1945 यावर नोंद करावी, तसेच www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर भेट देवून देखील तक्रार नोंद करावी.

सदरची कामगिरी श्री. संदिप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. मदन बल्लाळ, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व. वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सायबर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक, सुजितकुमार गुंजकर यांचेसह सपोनि/स्वप्नील वाव्हळ, पोउपनिरी/प्रसाद शेनोळकर, पोउनि/धनवडे, सफौ/संतोष चव्हाण, मपोहवा/माधुरी धिंडे, मपोअं/अमिना पठाण, मपोअं/स्नेहल पुणे, पोअं/कुणाल सावळे, मसुब/प्रविण सावंत, मसुब/बोरकर सायबर पोलीस ठाणे यांनी पार पाडली आहे.

सायबर फसवणुक हेल्पलाईन क्रमांक: १९३०/१९४५

सायबर फसवणुक हेल्पलाईन वेबसाईट www.cybercrime.gov.in

CYRER AWARENESS CAMPAIGN CE STATION 1930

Police Batmi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *