गरद (ब्राऊन शुगर) विक्रीसाठी जवळ बाळगणारा इसम अटकेत! | आचोळे पोलीस ठाण्याची मोठी कारवाई.

Breaking News Crime News Cyber Crime Latest News Political News Regional News

विरार – ब्राऊन शुगर (गरद) हा अंमलीपदार्थ विक्रीकरीता जवळ बाळगणाऱ्या ईसमास अटक -आचोळे पोलीस ठाणेची कामगीरी. अधिक माहितीनुसार दिनांक १८/०९/२०२५ रोजी मा. वरिष्ठांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे पोलीस ठाणे हद्दीमध्ये अंमली पदार्थ विक्री व सेवन करणारे इसम, बांगलादेशी नागरीकांचे वास्तव्य तसेच नायजेरीयन/आफ्रिकन नागरीकांकडुन होणाऱ्या ड्रग्ज विक्रीबाबत आचोळे पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार पोलीस ठाणे हद्दीमध्ये गस्त करतांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, नालासोपारा रेल्वे स्टेशनच्या पुर्व बाजुस कॅपीटल मॉल जवळ, एक ब्राऊन शुगर (गरद) या अंमलीपदार्थाची विक्री करण्यासाठी येणार आहे. मिळालेल्या माहिती बाबत गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी यांनी मा. वरिष्ठांना अवगत करुन वरिष्ठांचे परवाणगीने नमुद इसमावर कारवाई करण्यासाठी सापळा रचला.

दिनांक १८/०९/२०२५ रोजी दुपारच्या सुमारास विवा टाऊनशिप बिल्डींग, कॅपीटल मॉल जवळ, स्टेशन रोड, नालासोपारा पु. येथे एक संशयीत रित्या उभा व कोणाचीतरी वाट पाहत असल्याचे दिसुन आले. त्यावेळी गुप्त बातमीदारा करवी सदर ईसमाबाबत खात्री करुन त्यास गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी अंमलदार त्यास ताब्यात घेतले. नमुद इसमाचा अंगझडती घेतली असता त्याचेकडे ५६.०४ ग्रॅम इतक्या वजानाची ब्राऊन शुगर (गरद) हा अंमलीपदार्थ मिळुन आला. सदर वेळी त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने समसाद जमसेद आली वय-२४ वर्षे, व्यावसाय-रिक्षाचालक, राहणार आर. के. कॉलेज जवळ, नालासोपारा पुर्व ता. वसई जि. पालघर मुळ रा. पाडली गुजर, स्टेशन-रुडकी, जि-हरिद्वार, राज्य-उत्तराखंड असा सांगीतले त्यास पुढील कारवाई करीता ताब्यात घेवुन त्याच्या कडुन ११,७०,८००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन त्याचेवर आचोळे पोलीस ठाणे, दिनांक १९/०९/२०२५ रोजी गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना आरोपी याचे पोलीस कोठडीमध्ये त्याची घर झडती घेतली असता त्याचे राहते घरामध्ये २८ ग्रॅम इतक्या वजानाची ब्राऊन शुगर (गरद) हा अंमलीपदार्थ मिळुन आला. तरी नमुद अटक आरोपी याचे कडुन एकुण ८४.०४ ग्रॅम इतक्या वजानाची १७,४०,०००/-रुपये किंमतीची ब्राऊन शुगर (गरद) हा अंमलीपदार्थ मिळून आला सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोउनि/गुरुदास मोरे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. श्री. निकेत कौशिक, पोलीस आयुक्त, मा. श्री. दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, मा. श्रीमती पौर्णिमा चौगुले श्रींगी, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा.श्री. उमेश माने-पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त तुळींज विभाग यांच्या  मार्गदर्शनाखाली श्री. सुजितकुमार पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आचोळे पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोउनि/मंगेश वडणे, पोउनि/गुरुदास मोरे, सफौ / दत्तात्रय दाईंगडे, पोहवा/शंकर शिंदे, पोहवा/निखील चव्हाण, पोहवा/विनायक कचरे, पोहवा/अमोल सांगळे, पोअं/मोहनदार बंडगर, पोअं/मनोज पाईकराव, पोअं/गोविंद गुट्टे, पोअं/लोकेश कुवर, मपोशि/सिगमा पालशेतकर यांनी यशस्वी रित्या केलेली आहे.

Police Batmi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *