पालघर – तारापुर पोलीस ठाणे येथे दाखल खुनाचा गुन्हा उघड करण्यात पालघर पोलीसांना यश.मिळालेल्या माहितीनुसार दि.०३/०९/२०२५ रोजी पहाटे ००.०६ ते दि. ०३/०९/२०२५ रोजी १८.५९ वाजताचे दरम्यान बालाजी कॉम्पलेक्स, मधील बालाजी बिल्डींग नं. ०२, रुम नं. ००२, परनाळी ता.जि. पालघर येथे मयत हरिश सुखाडीया, अंदाजे वय ३० वर्षे यास आरोपी सुरेंदर चंद्र सिंह व रेखा दुर्गादास वैष्णव यांनी कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोणत्यातरी धारदार हत्याराने वार करुन जिवे ठार मारले. त्याबाबत तारापुर पोलीस ठाणे येथे दि. ०४/०९/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हयाचे गांर्भीय लक्षात घेता श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी स्थानिक गुन्हे शाखा पालघर व तारापुर पोलीस ठाणे यांचेकडील पोलीस अधिकारी व अमंलदार यांचे वेगवेगळी पथके तयार करुन त्यांना सदर गुन्हा उघडकीस आणणे बाबत मार्गदर्शन केले.
स्थानिक गुन्हे शाखा पालघर कडील पथकाने गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून गुन्हयाची माहिती घेवुन यातील आरोपीचा राजस्थान, मध्यप्रदेश व गुजरात राज्यात अथक परिश्रम घेवुन शोध घेवुन, बातमीदारांचे मदतीने माहिती मिळवुन व तांत्रीक माहितीच्या आधारे आरोपी १) सुरेद्रं चंद सिंग, वय ३४ वर्षे, २) रेखा दुर्गादास वैष्णव, वय २५ वर्षे दोन्ही रा. परनाळी ता.जि. पालघर मुळ रा. राजस्थान यांना वापी, गुजरात राज्य येथुन ताब्यात घेवुन त्यांचेकडे सखोल चौकशी केली असता प्रेमसबंधातुन सदरचा गुन्हा केल्याचे आरोपीनी कबुली दिलेली आहे. नमूद गुन्ह्यात आरोपींना अटक केले असून सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि/निवास कणसे, तारापुर पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, पालघर श्री. यतिश देशीमुख, अपर पोलीस अधीक्षक, पालघर श्री. विनायक नरळे, उप विभागीय पोलीस अधिकारी, बोईसर विभाग श्री. विकास नाईक यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक श्री. प्रदिप पाटील, पोउपनि/रोहीत खोत, पोउपनि/गोरखनाथ राठोड, श्रे. पोउपनि/राजेश वाघ, श्रे. पोउपनि /सुनिल नलावडे, पोहवा/दिपक राऊत, पोहवा/संदिप सुर्यवंशी, पोहवा/विजय ठाकुर, पोहवा/संजय थांगडा, पोहवा/नरेंद्र पाटील, पोना/कल्याण केंगार, पोअमं/प्रशांत निकम, पोअमं/वैभव जामदार सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर तसेच सपोनि/निवास कणसे, पोअमं/जितेंद्र वसावे, म. पोअमं/उज्वला पोतदार नेमणुक तारापुर पोलीस ठाणे यांनी पार पाडलेली आहे.
