तलासरी – २२,००,०००/- रुपये किंमतीचा चोरुन नेलेला टेम्पो हस्तगत करण्यात तलासरी पोलीसांना यश. अधिक माहितीनुसार दिनांक ०७/०९/२०२५ रोजी फिर्यादी रामआश्रम मंगु यादव यांना त्यांच्या मालकाने ‘एक भाडे असून तलासरी येथून साबण भरुन चिपळुन येथे घेवून जायचे आहे’ असे सांगितल्याने फिर्यादी यांनी होकार दर्शविल्याने दुसऱ्या दिवशी त्यांना नमूद भाडेसाठी फोन आला असता फिर्यादी हे चिंचोटी येथे डिझेल भरुन तलासरी येथे येत असताना मौजे मनोर जवळ त्यांना फोन करणारे दोन इसम भेटले. त्यांच्यासोबत ते मौजे दापचरी येथे सर्व्हिस रोडवर आले असतांना आरोपींनी फिर्यादीच्या टेम्पोची चावी काढून घेवुन फिर्यादीस एका कारमध्ये बसवून गुजरात बाजुकडे घेवुन गेले. तेथे एका हॉटेलवर जेवणासाठी थांबले असताना अंधाराचा फायदा घेवून फिर्यादी यांनी तेथून निसटून घडलेली हकीकत आपल्या मालकांला सांगितल्याने फिर्यादीचे मालक सदर ठिकाणी घ्यायला आले असता त्यांच्या मालकीचा टेम्पो क्रमांक एमएच-४८-सीक्यु-१४४९ हा उभ्या केलेल्या ठिकाणी मिळून न आल्याने तसेच सदरचा टेम्पो इतरत्र शोध घेवून तो मिळून न आल्याने फिर्यादी यांच्या तक्रारीवरून तलासरी पोलीस ठाणे येथे दिनांक ०८/०९/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरच्या दाखल गुन्हयात कोणताही पुरावा अथवा आरोपी यांचे वर्णन नसतांना गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपी निष्पन्न करून दिनांक १५/०९/२०२५ रोजी आरोपी स्वप्नील मधुकर दुमाडा रा. उसगांव बंधारा ता. गणेशपुरी जि. ठाणे यास ताब्यात घेवुन त्याच्याकडे सखोल चौकशी करता तो त्याच्या साथीदारासह सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यास दिनांक १५/०९/२०२५ रोजी अटक करून मा. डहाणु न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्याची दि. १७/०९/२०२५ रोजीपर्यंत पोलीस कोठडी मंजुर केलेली आहे. नमूद आरोपी याचेकडून गुन्हयात चोरीस गेलेला २२,००,०००/- रुपये किंमतीचा आयसर टेम्पो ट्रक हस्तगत करण्यात आला आहे. उर्वरीत आरोपीतांचा शोध सुरु असुन पुढिल तपास श्रेपोउनि/बबन गावीत, नेमणूक तलासरी पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी हि श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्रीमती अंकिता कणसे, उप विभागीय पोलीस अधिकारी डहाणु विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अजय गोरड, पोउपनि/विकास दरगुडे, श्रेणी पोउपनिरी/बबन गावीत, सपोउपनिरी हिरामण खोटरे, चालक पोअं/ योगेश नामदेव मुंढे सर्व नेमणूक तलासरी पोलीस ठाणे यांनी पार पाडली आहे.
