केवायसी अपडेटच्या नावाखाली आर्थिक फसवणूक; सायबर पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे तक्रारदारास ₹१,९९,०००/- ची रक्कम परत.

Breaking News Crime News Cyber Crime Latest News Political News Regional News

आचोळे- KYC अपडेट करण्याचे सांगुन तक्रारदार यांची फसवणुक झालेली १,९९,०००/- रुपये रक्कम परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश. अधिकमाहतीनुसार मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रातील आचोळे पोलीस ठाणेच्या  हद्दीतील तक्रारदार श्रीमती. जाधव यांना अनोळखी इसमाने फोन करुन बँकेतुन बोलत असल्याचे सांगितले. तक्रारदार यांची बँक खात्याची KYC तात्काळ अपडेट न केल्यास बँक खात्याचे व्यवहार बंद होणार असल्याचे सांगितले. त्यावर तक्रारदार यांनी अनोळखी इसमाने तक्रारदार यांचेकडुन त्यांचे बँक खात्याची व इतर वैयक्तिक माहिती घेतली व त्यानंतर तक्रारदार यांच्या  बैंक खात्यातुन रक्कम कपात झाल्याचा मॅसेज त्यांच्या  मोबाईलवर प्राप्त झाला. तक्रारदार यांची आर्थिक फसवणुक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी सायबर पोलीस ठाणे येथे तक्रारी अर्ज दिल्याने अर्जाची तात्काळ नोंद घेवुन NCCRP Portal वर 31907250131740 अन्वये देखील तक्रार नोंदविण्यात आली .

तक्रारदार यांची ऑनलाईन NCCRP Portal वर तक्रार नोंदविल्याने फसवणुकीची वर्ग झालेली रक्कम संशयीत बैंक खात्यात थांबविण्यात आली. तक्रारदार याची बँक खात्यांमध्ये थांबविण्यात आलेली रक्कम परत मिळविण्याकरीता मा. न्यायालयमध्ये अर्ज सादर करण्याबाबत तक्रारदार यांना सुचना देण्यात आल्या. तक्रारदार यांनी त्यांची फसवणुची रक्कम परत मिळविण्याकरीता मा. न्यायालयात याचिका सादर केलेली, त्याबाबत सायबर पोलीस ठाणे यांनी मा. न्यायालयामध्ये सविस्तर अहवाल सादर केला व मा. न्यायालयाचे आदेश प्राप्त केले.अश्याप्रकारे सायबर पोलीस ठाणे यांनी बँकेसोबत तसेच मा. न्यायालय यांचेकडे सातत्याने पाठपुरावा करून तक्रारदार यांची फसवणुक झालेली रूपये १,९९,०००/- रक्कम त्यांचे मूळ खात्यात परत मिळविण्यात आलेली आहे.

आहे. तक्रारदार यांची रक्कम परत मिळविण्यात आलेनंतर रक्कम परत केल्याबाबत प्रतिकात्मक चेक देवून माहिती देण्यात आलेली

अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी…

बँकेतील कर्मचारी बँक खात्याचे माहितीकरीता ग्राहकांना फोनद्वारे / एसएमएस संपर्क साधून कोणत्याही माहितीची देवाण-घेवाण करीत नाहीत.

फोनद्वारे कोणत्याही अनोळखी मोबाईल धारकास क्रेडीट/डेबिट कार्ड व बँकेच्या माहिती उघड करु नये.

बँक खात्यासंदर्भात कोणत्याही माहितीकरीता समक्ष बँकेत जावुन संपर्क करावा, फोनद्वारे कोणतीही माहिती उघड करु नये.

अनोळखी लिंक अगर मॅसेज प्राप्त झाल्यास पडताळणी केल्याशिवाय कारवाई करु नये.

कोणतेही ऍप  डाऊनलोड करण्यापूर्वी त्याची पडताळणी करावी.

अनोळखी मोबाईल धारकांना आपली वैयक्तिक माहिती / आर्थिक व्यवहारासंबंधीत माहिती उघड करु नये. आपले बँक खाते, जन्मदिनांक, OTP वा इतर वैयक्तीक माहीती उघड करू नये.

ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ बँकेला संपर्क करावा.

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे फसवणूक करणे कायदयाने गुन्हा आहे. असा प्रकार आपल्यासोबत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930/1945 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार यावी.

सदरची कामगिरी मा. श्री. संदिप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मा.श्री. मदन बल्लाळ, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांच्या  मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सायबर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर यांचेसह सपोनि/स्वप्नील वाव्हळ, पोउपनिरी/प्रसाद शेनोळकर, पोउनि/वैभव धनवडे, मपोहवा/माधुरी धिंडे, मपोअं/सुवर्णा माळी, पोअं/राहुल बन, मसुब राजेश भरकडे सर्व नेम सायबर पोलीस ठाणे यांनी पार पाडली आहे.

सायबर फसवणुक हेल्पलाईन क्रमांक १९३०/१९४५

सायबर फसवणुक हेल्पलाईन वेबसाईट www.cybercrime.gov.in

Police Batmi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *