पुरुषाचे रूप घेऊन वृद्ध सासऱ्याच्या घरी दरोडा टाकणाऱ्या महिलेचा पर्दाफाश – ₹१.५० कोटींचा मुद्देमाल हस्तगत.

Breaking News Crime News Cyber Crime Latest News Political News Regional News

वसई | १३ ऑगस्ट २०२५:पुरुषाचे रूप धारण करून बहीणीच्या वयोवृद्ध सासऱ्याला बाथरूममध्ये कोंडून तब्बल ₹१,५०,८४,०५०/- किंमतीचे सोनं-चांदी लंपास करणाऱ्या एका महिलेचा पर्दाफाश करत मध्यवर्ती गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे.दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी, दुपारी १.३० वाजता, फिर्यादी ओधवजी खिमजी भानुशाली, वय ६६ वर्षे, यांच्या राहत्या घरी एक अज्ञात व्यक्ती “रुम पाहण्याच्या बहाण्याने” आली. त्यानंतर बाथरूम वापरण्याचा बहाणा करत फिर्यादीला बाथरूममध्ये कोंडले व बेडरूममधील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.माणिकपूर पोलीस ठाण्यात त गुन्हा नोंदविण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या तपास पथकाने ७५ ते ८० सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीमध्ये चोरीनंतर एक महिला मुद्देमाल उचलून नेताना दिसली, पण पुरुष चोर दिसला नाही. यावरून हा ‘पुरुष’ चोर प्रत्यक्षात महिला असल्याचा संशय अधिक बळावला.तांत्रिक विश्लेषण व तपासाअंती निष्पन्न झाले की, ही महिला म्हणजेच ज्योती मोहन भानुशाली (वय २७), ही फिर्यादींच्या नातेवाईकाची सून आहे.गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील गणदेवी पोलीस ठाण्याच्या मदतीने, आरोपी महिलेची ओळख पटवून तिला अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान तिने गुन्हा कबूल केला.चोरी केलेले १४९०.८६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, २३२० ग्रॅम वजनाचे चांदिचे दागिने असा रुपये १,५०,८४,०५०/-_किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. निकेत कौशिक, मिरा भाईंदर वसई विरार यांनी केलेल्या आदेशाप्रमाणे तसेच मा. अपर पोलीस आयुक्त श्री. दत्तात्रय शिंदे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. संदिप डोईफोडे साो व मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाप्रमाणे मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोनि श्री. अविराज कुराडे, सपोनि श्री. प्रशांत गांगुर्डे, सपोनि श्री. दत्तात्रय सरक, सपोउपनि संतोष मदने, मनोहर तावरे आसिफ मुल्ला, पोहवा प्रविणराज पवार, समीर यादव, शिवाजी पाटील, धनजंय चौधरी, गोविंद केंद्रे, रविंद्र भालेराव, विकास राजपुत, रविंद्र कांबळे, हनुमंत सुर्यवंशी, विजय गायकवाड पोअंम नितीन राठोड, अंगद मुळे व मसुब सचिन चौधरी तसेच सपोउनि संतोष चव्हाण, नेम सायबर गुन्हे यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास माणिकपुर पोलीस ठाणे मार्फत करण्यात येत आहे.

Police Batmi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *