नायगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेची उत्कृष्ट कामगिरी – चोरीला गेलेले ₹६.२९ लाखांचे दागिने केवळ ४ तासांत हस्तगत.

Breaking News Crime News Cyber Crime Latest News Political News Regional News

नायगाव (ता. वसई, जि. पालघर): भजनलाल डेअरी, कामण, नायगाव पूर्व येथे २ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळच्या सुमारास घडलेल्या दागिने चोरीप्रकरणी नायगाव पोलिसांनी अवघ्या ४ तासांत कारवाई करत आरोपीस अटक केली असून, चोरी गेलेले ₹६,२९,३०६/- किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने १००% हस्तगत करण्यात आले आहेत.घटना अशी की, फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांनी नालासोपाऱ्याहून कल्याण येथे जाण्यासाठी रॅपिडो अ‍ॅपवरून कॅब (Ride ID: RD17541006795076963) बुक केली होती. चालक संदेश टोपरे (रा. निळमोरेगाव, नालासोपारा) याने गाडी क्रमांक MH-01-EM-5717 मधून सर्वांना घेऊन जात असताना भजनलाल डेअरी, कामण येथे गाडी थांबवून, महिलावर्ग वॉशरुमसाठी उतरले असता, संधीचा फायदा घेत आरोपीने बॅगेसह सोन्याचे दागिने घेऊन गाडीसह फरार झाला.या घटनेवरून नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला होता.

तपासाच्या अनुषंगाने, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या सहाय्याने आरोपी संदेश टोपरे याला कांदिवली, मुंबई येथून अटक करण्यात आली. कौशल्यपूर्ण चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून: ₹६,२९,३०६/- किंमतीचे दागिने,चोरीस वापरलेली ₹५ लाख किंमतीची मारुती वॅगनर कार जप्त करण्यात आली आहे.

ही कामगिरी मा. श्री. निकेत कौशिक, पोलीस आयुक्त, मा. श्री. दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त, मा. श्रीमती पौणिमा चौगुले पोलीस उप आयुक्त, परीमंडळ २ वसई, मा. श्री. नवनाथ घोगरे, सहाय्यक पोलीस आयुक्त वसई विभाग, नायगाव पोलीस ठाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अभिजीत मडके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि/गणेश केकान, पोउपनिरी/ज्ञानेश्वर आसबे, पोहवा/शेखर पवार, सचिन ओलेकर, सचिन मोहीते, पो.अंम. सचिन खंताळ, जयवंत खंडवी, अमर पवार, चेतन ठाकरे, अशोक पाटील, पाडुरंग महाले, पोहवा/अमोल बरडे नेमणुक पो.उप आयुक्त सोो परिमंडळ नं ०२, वसई यांनी यशस्वीरित्या कामगीरी पार पाडली आहे.

Police Batmi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *