पालघर (प्रतिनिधी) – दांडेकर कॉलेज, पालघर येथील अकाउंट विभागाच्या तिजोरीतून ११ लाख २५ हजार रुपयांची चोरी झाल्याच्या प्रकरणाचा पालघर पोलीसांनी पर्दाफाश केला असून, गुजरात येथून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ४.०५ लाख रुपये रोख देखील जप्त केले आहेत.ही घटना २३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता ते २४ जुलै रोजी सकाळी ७.४५ वाजताच्या दरम्यान घडली. याबाबत फिर्यादी श्री. मनोज शंकर परब (वय २७) यांनी पालघर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे, पुढील आरोपींचा शोध घेण्यात आला:1)शुभम विरेंद्र सिंग (वय २१) – रिक्षा चालक, उंबरगाव, गुजरात 2)मुरली मनोहर पवार (वय २३) – रिक्षा चालक, उंबरगाव, गुजरात,3)अरुण लखन चव्हाण (वय १९) – मिस्त्री, देवधाम, उंबरगाव, गुजरात, 4)फारुख फिरोज खान – उंबरगाव, गुजरातसदर आरोपींना उंबरगाव येथून ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून ४,०५,०००/- रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहेत.सदर गुन्ह्याचा पुढिल तपास हा पोउपनि/धनाजी काळे, नेमणुक पालघर पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कारवाई श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांच्या मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक श्री. प्रदिप पाटील, पोउपनि/रविंद्र वानखेडे, पोउपनि/गोरखनाथ राठोड, पोहवा/ दिनेश गायकवाड, पोहवा/कैलास पाटील, पोहवा / भगवान आव्हाड, पोहवा/ राकेश पाटील, पोहवा / संदीप सरदार, पोअं/ विशाल कडव, पोअं/ महेश अवतार सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर तसेच पोउपनि/रुपाली गुंड, पोअं/ रोहित तोरस्कर नेमणुक सायबर पोलीस ठाणे यांनी केलेली आहे.
