विरार (पालघर):वयस्कर महिलेला लक्ष्य करत तिच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने खेचून चोरी करणाऱ्या तीन आरोपींना केवळ २४ तासांत अटक करून गुन्ह्याचा यशस्वी तपास लावण्यात बोळींज पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाला मोठे यश मिळाले आहे.३० जुलै २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता, विरार पश्चिम येथील बोळींज नाक्याजवळ फिर्यादी श्रीमती रंजना उदय कालेकर (वय ५३) या आपल्या नातीला शाळेत सोडून घरी पायी जात असताना, त्यांच्या मागून आलेल्या एका अनोळखी इसमाने त्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले. अचानक झटापटी करत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली. यामध्ये त्यांच्या गळ्यावर किरकोळ जखम झाली.या घटनेची नोंद बोळींज पोलीस ठाणे येथे करण्यात आली होती.
गुन्हा अनोळखी व्यक्तींनी केल्यामुळे गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला.या तपासात ३ आरोपींची ओळख पटली आणि त्यांना पुढीलप्रमाणे अटक करण्यात आली:अब्दुल मोबीन इद्रिस खान (वय २८), रा. भांडुप, मुंबई, मोहम्मद झिशान अब्दुल अबरार अहमद (वय ३४), रा. चिंचणी, पालघर,दोघांना ३१ जुलै रोजी रात्री २.३० वाजता भांडुप परिसरातून अटक करण्यात आली.चेतन सुरेश वाघ ऊर्फ कोबरा ऊर्फ सैफ (वय २४), रा. दिवा, ठाणे,यास ३१ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता दिवा परिसरातून अटक केली.
तपासादरम्यान आरोपींनी सोन्याची चैन मनप्पुरम फायनान्स लिमिटेड, कांजूरमार्ग येथे गहाण ठेवल्याची कबुली दिली.चोरीसाठी वापरण्यात आलेली ₹१ लाख किमतीची वॅगनर कार जप्त करण्यात आली.पुढील चौकशीत त्यांनी सफाळे, पालघर येथेही अशाच प्रकारचा जबरी चोरीचा गुन्हा केल्याचे कबूल केले असून, संबंधित तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. निकेत कौशिक, पोलीस आयुक्त, श्री. दत्ताञय शिंदे अपर पोलीस आयुक्त, मि.भा.वि.पोलीस आयुक्तालय, श्री. सुहास यायचे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०३, विरार, श्री. विजय लगारे, सहाय्यक पोलीस आयुक्त, नालासोपारा विभाग यांचे मार्गदर्शनाखाली बोळींज पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रकाश कावळे, पोलीस निरीक्षक, श्री. प्रकाश सावंत (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोउपनि/किरण वंजारी, पोउपनि/विष्णु वाघमोडे, स. फौ. जनार्दन मते, स. फौ. किशोर धनु, पोहवा/रोशन पुरकर, प्रफुल्ल सरगर, सुखराम गडाख, पो. अमं. संदिप शेळके, तांत्रिक मदत पोहया/नामदेव ढोणे पोअं/सोहेल शेख नेम. परि ०३ विरार कार्यालय व एमएसएफ जवान सागर देशमुख यांनी केलेली आहे.
