३.३१ लाखांचा गैरव्यवहार उघड! पोलिसांनी उघड केला गुन्ह्याचा पर्दाफाश.

Breaking News Crime News Cyber Crime Latest News Political News Regional News

भाईंदर (प.): अवैध जुगार खेळणाऱ्या २० इसमांवर भाईंदर पोलीसांनी कारवाई करुन ३,३१,३५९ रुपयांचे मुद्देमालासह जुगाराचे साहित्य केले जप्त.अधिकमाहितीनुसार मा. श्री. राहुल चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ यांना त्यांच्या  विश्वसनीय सुत्रांकडुन मौजे भाईंदर पश्चिम येथील शांतिदर्शन बिल्डींग मधील दुसऱ्या माळ्यावरील रुम नं. २०१ या खोलीमध्ये काही इसम बेकायदेशीर रित्या पैसे लावुन तिन पानी जुगार खेळत व खेळवित असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने, सदरची माहिती रात्रौ अधिकारी सपोनि अनंता गायकवाड, भाईंदर पोलीस स्टेशन यांना सांगुन कायदेशीर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सपोनि अनंता गायकवाड यांनी दोन पंच व पोलीस स्टाफसह मिळालेल्या बातमीप्रमाणे दि. ०४/०८/२०२५ रोजी ०१.५० वा. छापा घातला असता सदर ठिकाणी १. संदीपकुमार विश्वनाथ केडीया वय १५ वर्षे २. जितेंद्र वालचंदजी पुनमीया, वय ५१ वर्षे, ३. मनिषकुमार जवेरीलाल पारीख, वय ३६ वर्षे, ४. फैज्ञान अब्दुल करीम शेख  वय  ४३ वर्षे, ‘५. सुमित अरुण दाधीच, वय ३९ वर्षे, ६. बजरंग धुराराम पारीख, वय ५२ वर्षे, ७. परमजित ब्रिगुनाथ सिंग, वय ४७ वर्षे, ८. विनोद देवराज पुनमिया वय ४८ वर्षे ९. गिलटर फ्रान्सिस दिनिस, वय ४४ वर्षे, १०. लहु तुकराम महाडीक, वय १८ वर्षे, ११. हिम्मतसिंग रामसिंग विष्ट वय ४८ वर्षे, १२. अजय गृहनाथ सिंग वय ४८ वर्षे ,१३.अभय सहजानंद शर्मा वय ४९ वर्षे, १४. रुतीक संजय कोळवणकर वय २८ वर्षे, १५. विशाल अनिलकुमार शर्मा, वय ३४ वर्षे, १६. वारीस जमीलउद्दीन खान, वय २८ वर्षे, १७. कुंदन बबन राजभर, वय २४ वर्षे १८. केवीन जोकीन ग्रसियस, चय ४७ वर्षे, १९. मो. समीर मो. सलीम गाझी वय ४ वर्षे ,२०. दिपक मुरारी सिंग वय ३२ वर्षे हे बंद घरामध्ये बेकायदेशिर रित्या पैसे लावुन ३ पत्ती जुगार खेळत असताना मिळुन आले,  त्यांचेकडुन ३,३१,३०५९ रुपयांचे मुददेमालासह जुगाराचे साहित्य जप्त करुन त्यांच्यासह  तसेच घर मालक मंदादेवी रामविलास जोशी यांनी जुगार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली म्हणुन, विष्णु  याने  जुगाराचा अड्डा चालविला म्हणून त्यांच्या विरुध्द भाईंदर पोलीस स्टेशनला गुन्हा  गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हयाचा तपास चालू आहे.

अशा रितीने मा. पोलीस आयुक्त श्री. निकेत कौशिक, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. दत्तात्रय शिंदे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ श्री. राहुल चव्हाण, मा. सहा. पोलीस आयुक्त श्रीमती दिपाली खन्ना यांच्या  मार्गदर्शनाखाली, भाईंदर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जितेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. महेंद्र निंबाळकर, सपोनि अनंता गायकवाड, नेमणुक भाईंदर पोलीस स्टेशन, पो.हवा/अभिजीत लक्ष्मण ठाकुर नेम- पोलीस उप आयुक्त साो झोन-०१ मिरारोड, पोहवा / रामनाथ शिंदे, नेमणुक भाईंदर पोलीस स्टेशन, पो.हवा / प्रवीण निवळे, पोहवा/प्रशांत महाले, पो.शि / हनमंत आटपाडकर, पो.शि/ओमकार पोखरकर, पो.शि/सागर धात्रक यांनी यशस्वी सापळा रचून, अवैध जुगार खेळणाऱ्या इसमांवर यशस्वी कारवाई केली आहे.

Police Batmi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *