नालासोपारा- खुनाच्या गुन्हयात दोषसिध्द झालेला जेल प्रशासनाने पॅरोलवर सोडलेल्या सुमारे ०४ वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीस पंजाब येथुन अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष ०२ यांना यश.अधिक माहितीनुसार दिनांक १५/०९/२०१६ रोजी १९.१५ वा. च्या सुमारास आरोपी शंकरजगदीश मुखीया ऊर्फ समोसेवाला रा. धानिवबाग तलावा जवळ, नालासोपारा पूर्व याने मयत दिलीप रघुनाथ बसनेत, रा. धानिवबाग तलावा जवळ, नालासोपारा पूर्व, याच्या पत्नी बाबत अश्लील बोलला असल्याने आरोपी व मयत त्यांच्यात वाद होऊन आरोपी याने मयत याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्यास जिवे ठार मारल्याबाबत वालीय पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद होता.
सदर गुन्हयात आरोपी शंकर जगदीश मुखीया ऊर्फ समोसेवाला यास मा. सत्र न्यायालय वसई यांनी दोषसिध्द ठरवुन त्यास शिक्षा सुनावली होती. नमुद गुन्हयात आरोपी हा ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये शिक्षा भोगत असतांना त्यास शासनाच्या जेएलएम-०३२०/प्रक्र-५८/ तुरुंग-२ या परिपत्रकान्यये त्याच्या राहत्या पत्यावर मकसूद चाळ, थानियबाग तलाया जवळ, नालासोपारा पूर्व येथे कारागृह प्रशासनाने आपातकालीन अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते. त्याचा रजेचा कालावधी दिनांक ०७/०५/२०२२ रोजी संपला होता. त्यानंतर त्यास कारागृहामध्ये हजर होण्याबाबत कळविण्यात आले होतो. परंतु नमुद आरोपी हा कारागृहात तसेच पोलीस ठाण्यात हजर न राहता फरार झाल्याने त्याचे विरुध्द फिर्यादी श्री. संतोष नामदेव मगर, व्यवसाय नोकरी (कारागृह शिपाई, नेमणूक ठाणे मध्यवर्ती कारागृह) यांनी जेल प्रशासनाच्या तर्फे पेल्हार पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. नमुद आरोपी बंदीक्र.सी./६७६२ शंकरजगदीश मुखीया ऊर्फ समोसेवालाहा त्यास अभिवचन रजेवर सोडल्यापासुन फरार होता.
वर नमुद आरोपी याचा शोध घेणेबाबत मा. वरिष्ठांनी पोलीस पथकास आदेश दिले होते. मा. वरिष्ठांचे आदेशान्वये गुन्हे शाखा कक्ष- ०२ चे पोलीस पथकाने नमुद गुन्हयाचा समांतर तपास सुरु केला. सदर गुन्हयातील आरोपी याचा तो राहण्यास असलेल्या धानिवबाग नालासोपारा पूर्व येथील पत्यावर जाऊन शोध घेतला असता आजुबाजुच्या परिसरातुन नमुद आरोपी याने वालीव पोलीस ठाणे येथे दाखल असलेला खुनाचा गुन्हा केल्या पासुन सदर परिसरात आला नसल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती. आरोपी हा मुळ राज्य बिहार येथील रहिवासी असल्याने त्याचे मुळ गाची देखील गुप्त बातमीदारा मार्फत माहिती घेतली असता नमुद आरोपी हा त्याच्या मुळ गावी देखील राहवयास नसल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती. नमुद आरोपी यास वालीव पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या खुनाचे गुन्हयात शिक्षा झालेली असल्याने व त्यास अभिवचन रजेवर सोडल्यानंतर तो वारंवार त्याचे नाव बदलून अस्तित्व लपवून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करत असल्याने त्याचा शोध घेण्यात अडथळा निर्माण होत होता. गुन्हे शाखा कक्ष ०२ चे पथक आरोपीचा सुमारे ०२ महिन्यापासुन सातत्याने शोध घेत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत नमुद आरोपी हा पंजाब राज्यामध्ये त्याची ओळख बदलुन वास्तव्य करत असल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती. गुप्त बातमीदारा मार्फत आरोपी याचे बाबत अधिक माहिती प्राप्त करुन तसेच त्याचे बाबत प्राप्त माहितीचे तांत्रिक विश्लेषण करता नमुद आरोपी हा पंजाब राज्यातील भगतसिंग नगर जिल्हयात वास्तव्य करत असल्याबाबत खात्रिशिर माहिती प्राप्त झाली.त्यानुसार आरोपीस अटक करण्याकरीता गुन्हे शाखा कक्ष ०२ चे पोलीस पथक भगतसिंग नगर, राज्य पंजाब येथे रवाना करण्यात आले होते. पोलीस पथकाने दोषसिध्द झालेला आरोपी शंकर जगदीश मुखीया ऊर्फ समोसेवाला, वय ३४ वर्षे, मुळ रा. राज्य बिहार यास सदर बंगा पोलीस ठाणे हद्दीतुन जि. शहिद भगतसिंग नगर राज्य पंजाब येथुन अटक केली आहे.
सदरची कामगिरी श्री. निकेत कौशिक, पोलीस आयुक्त साो, श्री. दत्तात्रेय शिंदे, अपर पोलीस आयुक्त साो, श्री. संदीप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त साो (गुन्हे), श्री. मदन बल्लाळ, सहा. पो. आयुक्तसाो (गुन्हे), मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. समीर अहिरराय, सहा. पोलीस निरीक्षक, श्री. सोपान पाटील, श्री. सागर शिंदे, पोलीस उप निरीक्षक, श्री. अजित गिते, सहा. पोलीस उप निरीक्षक/संजय नवले, मुकेश पवार, रविंद्र पवार, मनोज मोरे, चंदन मोरे, पोहवा/प्रफुल्ल पाटील, प्रशांतकुमार ठाकुर, सचिन पाटील, जगदीश गोवारी, दादा आडके, सुधीर नरळे, राहुल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे, प्रतिकगोडगे, राज गायकवाड, मसुब/रामेश्वर केकान, अविनाश चौधरी, सर्व नेम गुन्हे शाखा कक्ष ०२ वसई तसेच सायबर सेलचे सफौ/संतोष चव्हाण यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
