विरार- शुटिंग साहित्याचा (कॅमेरे) अप्रामाणिकपणे अपहार करणाऱ्या गुन्हेगारांना जेरबंद करण्यास गुन्हे शाखा कक्ष- ३ विरार यांना यश. अधिक माहितीनुसार दिनांक २२/०७/२०२५ रोजी ११.२० वाजता अनोळखी आरोपी यांनी स्वतःची खरी ओळख लपवुन फिर्यादी यांना संपर्क करुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन फिर्यादीकडील शुटींगचे साहित्य (कॅमेरे) एक दिवसासाठी भाडयाने बुक केले. फिर्यादी हे त्यांचे शुटींगचे साहित्यासह आरोपी यांच्या सोबत त्यांच्या गाडीतुन जात असतांना आरोपी यांनी नाश्ता करण्याचे बहाण्याने त्यांची कार विरारफाटा जवळील जार हॉटेल येथे थांबवल्याने फिर्यादी हे हॉटेल मध्ये नाश्ता करण्यासाठी गेले असता आरोपी यांनी फिर्यादी यांचे एकूण ११,१६,९००/- रुपये किंमतीचे शुटींगचे साहीत्य अपहार करुन घेवुन गेले म्हणुन या बाबत दिनांक २२/०७/२०२५ रोजी मांडवी पोलीस ठाणे गुन्हा नोंद करण्यात आला .
मा. वरिष्ठांनी सदर गुन्ह्यांची गांभिर्याने दखल घेवुन नमुद गुन्ह्यातील आरोपींचा लवकरात लवकर शोध घेवून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना केलेली होती. तरी मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी दिलेल्या सुचना व आदेशान्वये सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना असे आढळुन आले की, आरोपी यांनी गुह्यात वापरलेल्या वॅगनार कारची मुळ नंबरप्लेट ही गुन्हा करते वेळी बदलुन बनावट नंबरप्लेटचा वापर केल्याचे लक्षात आले. त्यामुळे भिवंडी, ठाणे व नवी मुंबई परिसरातील सुमारे १०० पेक्षा अधिक सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासुन गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषन करुन इसम १) रुद्र श्रीकांत कोळी वय २० वर्षे, रा. रुम नं.४०६, चौथा माळा, डी विंग, वसंत विहार बिल्डींग, सुकापूर, पनवेल. २) विवेक ऋषीकेश सिंग वय २४ वर्षे, रा.रुम नं.९९२, सेक्टर ३६, सी वुड, नवी मुंबई यांना दिनांक २८/०७/२०२५ रोजी नेरुळ, नवी मुंबई येथुन ताब्यात घेतले. यांच्याकडे गुन्ह्यांच्या अनषंगाने चौकशी केली असता त्यांचा नमुद गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला आहे. तसेच नमुद आरोपींना सदरचा गुन्हा करण्यासाठी वापरलेली वॅगनार कार ही देखील हस्तगत करण्यात आली असुन नमुद आरोपी व गुन्ह्यातील वाहन पुढील कारवाई करीता मांडवी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी श्री. निकेत कौशिक, पोलीस आयुक्त साो., श्री. दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त साो.. श्री. संदिप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त साो. (गुन्हे), श्री. मदन बल्लाळ, सहा. पोलीस आयुक्त साो (गुन्हे) मि.भा.वि.व पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक / शाहुराज रणवरे, स.पो.नि./सुहास कांबळे, पो.हवा./ मुकेश तटकरे, सागर बारवकर, प्रशांत पाटील, राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, पो.अं. / आतिश पवार, तुषार दळवी, मनोहर तारडे, म.सु.ब/ प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे सर्व नेमणुक गुन्हे शाखा कक्ष ३ व सायबर पोलीस ठाणेचे स. फौ. संतोष चव्हाण यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे.
