मुंबई, प्रतिनिधी- दिनांक १३ एप्रिल २०१८ मराठी अस्मितेच्या जाज्वल्य जिवंततेसाठी कार्यरत असलेल्या मराठी एकीकरण समितीच्या कार्याध्यक्षपदी अॅड. प्रदीप सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निमित्ताने समितीचं वतीने औपचारिक नियुक्तीपत्र देण्यात आलं.
ही नियुक्ती मराठी एकीकरण बातमीपत्राचे संपादक व मराठी एकीकरण समितीचे सल्लागार डॉ. दीपक मोरेश्वर नाईक यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. गोवर्धन देशमुख उपाध्यक्ष, श्री. प्रमोद पार्टे, सरचिटणीस श्री कृष्णा. जाधव, तसेच रेशमा डोळस हे मान्यवर उपस्थित होते.
मराठी भाषेच्या आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी लढा देण्याचा निर्धार या कार्यक्रमात करण्यात आला. नव्या कार्याध्यक्षांच्या नेतृत्वाखाली समिती अधिक सक्रिय होईल असा विश्वास या वेळी वक्त्यांनी व्यक्त केला.
