पालघर पोलीसांची मोठी कारवाई 🚨 | तब्बल ₹1.78 कोटींचा तंबाखूजन्य मुद्देमाल जप्त.

Breaking News Crime News Cyber Crime Latest News Political News Regional News

पालघर – दिनांक २५ जुलै २०२५ रोजी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली की दोन कर्नाटक पासिंगच्या कंटेनर ट्रकद्वारे प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची अवैध वाहतूक मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून मुंबईकडे होत आहे. सदर माहितीच्या आधारे संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले.

पोलीस निरीक्षक अजय गोरड (तलासरी पोलीस ठाणे) आणि पोनि प्रदिप पाटील (स्थानिक गुन्हे शाखा, पालघर) यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र पथके तयार करून तलासरी येथील विकासपाडा परिसरात सापळा रचण्यात आला.दुपारी सुमारे १:१५ वाजता संशयित ट्रक क्रमांक KA-56-9490 व KA-39-A-3012 थांबवून तपासणी करण्यात आली. ट्रक चालकांनी दिलेल्या माहितीवरून व त्यांच्या उडवाउडवीच्या उत्तरांवर संशय आल्याने ट्रकची तपासणी करण्यात आली. ट्रकमधील भाताच्या तुसामध्ये लपवलेला एकूण १,७८,६५,२४८/- रूपये किंमतीचा गुटखा व पानमसाल्याचा साठा आढळून आला.

त्याचप्रमाणे, दोन्ही ट्रक मिळून एकूण मुद्देमालाची किंमत ₹1,78,65,248/- इतकी आहे.

आरोपींची नावे खालीलप्रमाणे:

इफ्तेकार हबीब शेख, वय ४२ वर्षे, रा. कुर्ला (प.), मुंबई

अक्षय नंदकुमार सातपुते, वय २९ वर्षे, रा. ता. बत्तीस शिराळे, जि. सांगली

या दोघांविरोधात IPC कलम 123, 223, 274, 275, तसेच अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ व २०११ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पो.उ.नि. दरगुडे हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्रीमती अंकिता कणसे, उपविभागीय पोलीस अधिकारी, डहाणु विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. प्रदिप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, पोलीस निरीक्षक श्री. अजय गोरड, तलासरी पोलीस ठाणे, पोउपनि/दरगुडे श्रेपोउपनि/एन.के. पाटील, सफी/हिरामण खोटरे, पोहया/ थोडी, पोहवा/पी. पाटील, पोहया/संदिप नांगरे, पोहवा/पी. के. चौरे, पोना/सचिन आव्हाड, पोअं/वरखंडे, पोअं/घाटाळ, पोअं/के. एन. राबड, पोअं/एन. जी. गांगोडा, पोअं/के. डी. गांगोडा सर्व नेमणुक तलासरी पोलीस ठाणे तसेच पोअं/नरेश घाटाळ, पोअं/बजरंग अमनवाड, नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी केलेली आहे.

Police Batmi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *