मिरारोड – घरफोडी करण्याच्या तयारीत असणाऱ्या इसमांना अटक.अधिकमाहीती नुसार दिनांक ०१/०३/२०२४ रोजी मिरारोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार मिरारोड पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात गुन्हे प्रतिबंध गस्त करीत असतांना गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन संशयित इसमांना ताब्यात घेवुन त्यांची विचारपुस केली असता १) सागर दिपक सोनी वय.२२ वर्षे, रा. फिरस्ता काशमिरा फ्लायओव्हर ब्रिज खाली काशिमिरा नाका, मिरारोड पुर्व ता. जि. ठाणे व २) अजय अनिता पटेल वय.२१ वर्षे रा. गल्ला नं.०८, भरत कंम्पाऊंड झोपडपट्टी, मांडवी पाडा, काशिमिरा, मिरारोड पुर्व ता. जि. ठाणे असे त्यांनी आपली ओळख सांगितली तसेच त्यांच्या ताब्यात पोलीसांना एक लोखंडी हतोडा व एक लोखंडी छनी असे घरफोडी करीता वापरण्यात येणारे हत्यार मिळुन आले. नमुद आरोपी हे घरफोडी, चोरी गुन्हा करण्यासाठी एकत्र जमल्याचे निर्दशनास आले आहे. म्हणुन सदर इसमांनी घरफोडी, चोरी करण्याच्या उद्देशाने एकञ येवुन सवयीने अशाप्रकारचे गुन्हे करीत असल्याने त्यांच्याविरोधात मिरारोड पोलीस ठाणे गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली आहे.
आरोपी १) सागर दिपक सोनी वय २२ वर्षे याच्यावर यापुर्वी १) मिरारोड पोलीस ठाणे व २) भाईंदर पोलीस ठाणे असे २ गुन्हे नोंद आहेत. २) भाईंदर पोलीस तसेच आरोपी २) अजय अनिता पटेल वय २१ वर्षे याच्यावर १) मिरारोड पोलीस ठाणे येथे गुन्हे नोंद आहेत.
सदरची कामगिरी श्री.प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०१, मिरारोड पुर्व, डॉ. श्री. विजय मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मिरारोड पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चंद्रकांत सरोदे, पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पाटील (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि / संतोष सांगवीकर, पोउपनि / किरण वंजारी, पोहवा / प्रफुल्ल महाकुलकर, बालाजी हरणे, परेश पाटील, पो. अमं. शंकर शेळके, अथर्व देवरे यांनी केलेली आहे.
