३१,००,०००/- रुपयांची गुगलवर ओला कस्टमर केअर यांचा मोबाईल नंबर शोधत असतांना Any Desk वरुन फसवणुक.

Breaking News Crime News Cyber Crime Latest News Political News

काशिमीरा – गुगलवर ओला कस्टमर केअर यांचा मोबाईल नंबर शोधत असतांना Any Desk हे थर्डपार्टी स्टाफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगुन तक्रारदार यांची एकुण ३१,००,०००/- रुपयांची फसवणुक करुन त्यापैकी ९,९०,०००/- रुपये रक्कम तक्रारदार यांना परत करण्यात काशिमीरा पोलीस ठाण्यास यश.अधिकमाहीतीनुसार

मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील काशिमीरा पोलीस स्टेशन परीसरात राहणा-या श्रीमती. माया चक्रवती ह्या गुगलवरुन कस्टमर केअरचा नंबर प्राप्त करुन फोन केला असता ओला ऍप नावाने BFK ॲप पाठविले सदरचे ऍप डाऊनलोड करण्यास सांगुन त्याद्यारे संशयीत यांनी फिर्यादी याच्या खात्यावरुन इलेक्ट्रॉनिक साधनाचा वापर करुन फिर्यादी याची ३१,४०,५००/- रुपयाची फसवणुक झाली होती. सदर फसवणुकीच्या अनुषंगाने काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

या तक्रारी बाबत तात्काळ गुन्हा दाखल करुन घेवून तक्रारदार यांचे झालेल्या व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली. प्राप्त माहितीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांची रक्कम वेगवेगळया बँक खात्यात वळती झाल्याचे दिसुन आले. त्या अनुषंगाने तक्रारदार यांची रक्कम गोठविण्याबाबत संबंधीत बँकेसोबत पत्रव्यवहार करुन संशयीत खात्यामध्ये रक्कम गोठविण्यात आली. त्यानंतर मा. न्यायालयाकडुन तक्रारदार यांची रक्कम परत मिळविण्याकरीता काशिमीरा पोलीस ठाणेचे अधिकारी / अंमलदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने तक्रारदार यांची फसवणुक झालेल्या रक्कमेपैकी ९,९०,०००/- रुपये रक्कम त्यांचे खात्यावर परत मिळविण्यात आली आहे.

अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी…

  • अशा प्रकारे फसवे कॉल अथवा एसएमएस प्राप्त झाल्यास त्यावर कोणत्याही प्रकारे प्रतिसाद देवू नये.
  • आपल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त होणारे एसएमएस, ईमेल, कॉल्स यांची विश्वासहर्ताची पडताळणी करावी.
  • आपले मोबाईलवर प्राप्त होणारा OTP किंवा आपली वैयक्तीक माहिती देवु नये.
  • तसेच फसवणुक झालेचे लक्षात येताच लागलीच नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा,
  • कोणतेही अनाधिकृत अॅप्लीकेशन डाऊनलोड करु नये अथवा अनोळखी लिंकवर क्लिक करु नये.
  • ऑनलाईन फसवणुक झाल्यास तात्काळ बँकेला संपर्क करावा.

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे फसवणूक करणे कायदयाने गुन्हा आहे. असा प्रकार आपल्या सोबत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी.

सदरची कामगिरी श्री. प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त परि ०१, मिरा रोड, श्री. विजय कुमार मराठे, सहा. पोलीस आयुक्त, मिरा रोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक श्री. राहुल सोनवणे, पोलीस उप निरीक्षक वैभव धनावडे, पो हवा / ०६२०६ दिनेश आहेर यांनी पार पाडली आहे.

Police Batmi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *