विरार– घरफोडी चोरी करणाऱ्या गुजराती टोळीस अटक करुन, गुन्हे उघडकीस आणण्यात विरार पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश.मिळालेल्या माहीतीनुसारविरार पोलीस ठाणे हद्दीत दि.०९/०२/२०२४ रोजी पहाटेच्या दरम्यान विठ्ठल हरी टॉवर, महाविर नर्सिंग होमजवळ, विरार (प.), ता. वसई, जि. पालघर येथील राहणारे आनंद भवरलाल जैनार,यांच्या घराच्या हॉलची खिडकी कोणीतरी अज्ञात चोरटयाने उचकटून त्यावाटे घरात आत प्रवेश करुन, घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल घरफोडी चोरी करुन चोरुन नेले याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन विरार पोलिस ठाण्यात दि.११/०२/२०२४ रोजी
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी लागलीच गुन्ह्याट्या घटनास्थळी भेट देवुन, मा. वरिष्ठांचे मागदर्शनाखाली चार वेगवेगळी पथके तयार करुन, गुन्हयाचे घटनास्थळाचे आजुबाजुस मिळालेल्या सी. सी. टी. व्ही. फुटेजचे आधारे संशयीत आरोपींचा मागोवा काढत असतांना, नमुद आरोपी हे वापी, गुजरात येथे असल्याची माहिती मिळाल्याने, लागलीच सदर ठिकाणी जावुन, गुप्त बातमीदार व तांत्रिक माहीतीच्या आधारे गुन्हयातील ०२ आरोपींना वापी, राज्य-गुजरात तसेच ०१ आरोपीस उरण, नवी मुंबई येथुन सापळा रचुन शिताफिने १) दिपक भाकीयादार ऊर्फ बोबडया, वय २८ वर्षे, रा. उरण- मोरा रोड, उरण, जि. रायगड, २) मोहमद तारीक खान ऊर्फ टिंकल, वय-३२ वर्षे, रा. कब्रस्तान रोड, वापी (प.), जि. वलसाड, राज्य – गुजरात, ३) धमेंद्र पासवान, वय- ३५ वर्षे, रा.रजा गल्ली, छिरी, वापी (पु.), जि. वलसाड, राज्य- गुजरात, यांना ताब्यात घेवुन,त्यांना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
पोलीस चौकशी दरम्यान आरोपी यांच्याकडुन- १ )एकुण- १२.५२० ग्रॅम सोन्याचे दागिने, २)वेगवेगळ्या कंपन्यांचे एकुण – ०२ मोबाईल फोन, ३)३३,०००/- रुपये रोख रक्कम असा एकुण- १,२४,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन. आरोपी यांचेकडून विरार पोलीस ठाण्यातील २ गुन्हे उघडकीस आले आहे.
त्याचप्रमाणे आरोपी १) दिपक भाकीयादार ऊर्फ बोबडया, वय २८ वर्षे, याच्यावर गुजरात राज्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये विविध कलमांखाली एकुण – १३ गुन्हे दाखल असुन, आरोपी २)मोहमद तारीक खान ऊर्फ टिंकल, वय – ३२ वर्षे, याचेवर गुजरात राज्यातील वेगवेगळया पोलीस ठाण्यांमध्ये विविध कलमांखाली एकुण – ०६ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी श्री. सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ३, विरार, श्री. रामचंद्र देशमुख, सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाणेचे श्री. विजय पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. सुशिलकुमार शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स.पो.नि. ज्ञानेश फडतरे, पो.उप निरी. अविनाश हाटखिळे, पो. हवा. सचिन लोखंडे, संदिप जाधव, विशाल लोहार, इंद्रनिल पाटील, संदिप शेरमाळे, पो. अं. संदिप शेळके, मोहसिन दिवान, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, रोशन पुरकर, दत्तात्रय जाधव, प्रफुल सोनार, तसेच पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३, कार्यालयाचे पो.हवा. नामदेव ढोणे, व पो. अं. संतोष खेमनर, यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे.
