वसई : एक देशी बनावटीची पिस्टल, ०२ जिवंत काडतुसांसह ०१ आरोपीस अटक पेल्हार पोलीस ठाणे – गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगीरी .पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत दि. २९/०१/२०२४ रोजी २. ०० वा.च्या सुमारास पेल्हार गाव, पेल्हार हॉटेलच्या जवळ, ता. वसई जि. पालघर येथे एक इसम त्याच्या जवळ बेकायदेशिर रित्या अग्निशस्त्र घेवुन येणार असल्याची गुप्त बातमीधारकांकडून खात्रीशिर बातमी पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जितेंद्र वनकोटी यांना मिळाल्याने, सदर बातमीच्या आधारे त्यांनी लागलीच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी अंमलदार यांना सदर ठिकाणी सापळा रचुन त्या इसमास ताब्यात घेऊन कायदेशिर कारवाई करण्याबाबत आदेश दिले. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी सापळा रचुन शिताफिने,नाव – भव्य चैतन्य दवे, वय २५ वर्षे, रा. दहिसर पश्चिम मुंबई यास ताब्यात घेतले. पोलिसांनी नमुद आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात ०१ देशी बनावटीची पिस्टल, व ०२ जिवंत काडतुस, असा एकुण ४८,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने, तो जप्त करण्यात आला आहे. या बाबत पेल्हार पोलीस ठाणे दिनांक २९/०१/२०२४ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी श्री. मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, सो, श्री. श्रीकांत पाठक, अपर पोलीस आयुक्त मि. भा.व. वि पोलीस आयुक्तालय, श्री. सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त साो, परिमंडळ- ३, विरार, श्री. रामचंद्र देशमुख, सहायक पोलीस आयुक्त सो, विरार विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. जितेंद्र वनकोटी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो, श्री. शिवानंद देवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पेल्हार पोलीस ठाणे, व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.उप.निरी. तुकाराम भोपळे, पो.हवा. योगेश देशमुख, फिरोज तडवी, अविनाश देसाई, तानाजी चव्हाण, पो.अं. रवि वानखेडे, किरण आव्हाड, निखील मंडलिक, राहुल कर्पे, दिलदार शेख पेल्हार पोलीस ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
