Investment Scheme/ Task संदर्भात दोन वेगळ्या प्रकरणातील फसवणूक झालेली रक्कम सुमारे १८७०२४/- पोलिसांनी केली परत.

Breaking News Crime News Cyber Crime Latest News Political News

भाईंदर – Investment Scheme/ Task Fraud द्वारे ऑनलाईन फसवणूक झालेल्या दोन वेगवेगळया प्रकरणांमधील रक्कम रुपये १८७०२४/- परत करण्यात सायबर पोलीस ठाणेस यश. अधिकमाहीतीनुसार मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रातील भाईंदर पोलीस ठाणे हद्दीतील प्रियांका उपाध्याय यांना व्हॉट्सॲपद्वारे गुंतवणूक स्किम पाठवून त्यांना जास्त परतावा देण्याचे आमिष दाखूवन टेलीग्रामच्या ग्रुपमध्ये अशा प्रकारे परतावा खूप व्यक्तींना भेटल्याचे भासवून बिट कॉईनमध्ये गुंतवणुक करण्यास सांगुन ९००२४/- रु ची फसवणुक केली याबाबत सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार दिली या  तक्रारीबाबत तात्काळ दखल घेवून तक्रारदार यांचे झालेल्या व्यवहाराबाबत सायबर कक्षाने माहिती प्राप्त केली व तात्काळ पत्रव्यवहार करून व सातत्यपुर्ण पाठपुरावा करून नमूद फसवणूक रक्कम थांबविण्यात आली व माननीय महानगर दंडाधिकारी, ठाणे यांचे आदेशाने ९००२४/- फसवणूक रक्कम तक्रारदार यांचे मुळ खात्यावर परत मिळविण्यात आली.

तसेच मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रातील विरार पोलीस ठाणेचे हद्दीतील प्रिंयका पंकज भोईर यांची विविध टास्कमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून सुरवातीला काही रक्कम अदा करून विश्वास संपादन केला व त्यानंतर मोठ्या रक्कमेची गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल याकरीता टेलीग्राम ॲपद्वारे टास्क पुर्ण करण्यास सांगुन १,५९,०००/- रु ची फसवणुक केली याबाबत सायबर पोलीस ठाणे येथे दिनांक ०८/०५/२०२३ रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने नमूद तक्रारीबाबत सायबर कक्षाने तात्काळ दखल घेवून तक्रारदार यांचे झालेल्या व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करुन तात्काळ पत्रव्यवहार करून व सातत्यपुर्ण पाठपुरावा करून नमूद फसवणूक रक्कम थांबविण्यात आली व माननीय महानगर दंडाधिकारी, ठाणे यांच्या आदेशाने ९७०००/- फसवणूक रक्कम तक्रारदार यांचे मुळ खात्यावर परत मिळविण्यात आली.

अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी…

  • Online फसवणूकीसंदर्भातील कोणतेही एसएमएस, लिंकबाबत कोणत्याही प्रकारे सहभागी होवू नये.
  • Investment/Task फसवणूकीसंदर्भात पुर्णत: खात्री करूनच ऑनलाईन व्यवहार करावे.
  • आपले बँक खाते, जन्मदिनांक, OTP वा इतर वैयक्तीक माहीती देवू नये.
  • अनोळखी लिंक, ऍप्लिकेशन डाऊनलोड करू नये.
  • ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ बँकेला संपर्क करावा.

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे फसवणूक करणे कायदयाने गुन्हा आहे. असा प्रकार आपल्यासोबत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी.

सदरची कामगिरी श्री.अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. मदन बल्लाळ, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. सुजितकुमार गुंजकर, सपोनि/स्वप्नील वाव्हळ, पोउपनिरी/ प्रसाद शेनोळकर, मपोहवा / माधूरी धिंडे, पोअं/ प्रविण आव्हाड, पोअं/ गणेश इलग, मपोअं/  सुवर्णा माळी, मपोअं/ पल्लवी निकम, मपोअं/अमिना पठाण पोअं/ कुणाल सावळे, पोअं./ प्रशांत बोरकर यांनी पार पाडली आहे.

सायबर पोलीस ठाणे व्हाट्सअप हेल्पलाईन क्रमांक :- ९०० ४८८०१३५

सायबर पोलीस ठाणे ई-मेल आयडी :- cybercrime.mb-vv@mahapolice.gov.in

Police Batmi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *