वसई (दि.११) – घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करुन रु २,४१,६८५/- रोख रक्कम व चांदीचे दागिने हस्तगत करण्यात माणिकपुर गुन्हे प्रकटीकरण पथकास यश. अधिक माहीतीनुसार माणिकपुर पोलीस ठाणे हद्दीमध्ये. धर्मिल महेंद्र शहा, वय ३९ वर्षे यांच्या के.टी.बिल्डिर्स (के.टी. ग्रुप), तिसरा माळा, के. टी. ॲम्पायर, वसई स्टेशन रोड, वसई पश्चिम, जि. पालघर येथील बंद ऑफिसचा मागील गेट कशाच्या तरी साहाय्याने तोडुन ऑफिसमध्ये प्रवेश करुन ४,५५,०००/- किंमतीचे चांदीचे सिक्के, चांदीचे ग्लास व रोख रक्कम चोरी केले म्हणुन माणिकपुर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
माणिकपुर पोलीस ठाणे हद्दीमध्ये वारंवार घरफोडी सारखे गुन्हे होत असल्याने मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०२, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त वसई व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो यांनी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन माणिकपुर गुन्हे प्रकटीकरण पथकास आरोपींचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने वसई, विरार तसेच अंधेरी, मुंबई परिसरातील जवळपास १५० सि. सि.टि.व्ही. कॅमेरे चेक अरुन आरोपींचा मागोवा घेतला असता सदरचे आरोपी हे अंधेरी रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाल्याने अंधेरी, मुंबई येथुन सापळा रचुन आरोपी १) राहुल ऊर्फ अमर सुरेंदर सिंग, वय ३५ वर्षे, रा. पब्लिक प्लायओव्हर ब्रिच, अंधेरी रेल्वे स्टेशन फिरस्ता, अंधेरी, मुंबई, २) करण ओमप्रकाश खैरवाल, वय २४ वर्षे, रा. खार रेल्वे स्टेशन फिरस्ता, खार, मुंबई यांना शिताफीने अटक करुन त्यांचेकडुन रु. २,४१,६८५/- रोख रक्कम चांदिचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.
सदर कारवाई श्रीमती पौणिमा चौगुले – श्रींगी, पोलीस उप आयुक्त, श्रीमती पद्मजा बडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. राजु माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. मिलिंद साबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. ऋषिकेश पवळ (पोलीस निरीक्षक प्रशासन) गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पो.उ.नि. सनिल पाटील, पो.ह. शैलेश पाटील, पो. ह. धनंजय चौधरी, पो.ह. शामेश चंदनशिवे, पो.शि. गोविंद लवटे, पो.शि. आनंदा गडदे, पो. शि. प्रविण कांदे व म.पो.शि. पुजा कांबळे यांनी केलेली आहे.
