विरार – दुचाकी वाहने चोरी करणाऱ्या आरोपींना अटक- विरार पोलीस ठाणे- गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. अधिक माहीतीनुसार हर्षल राजेश तरे वय-२७ वर्षे,रा. येसुबाई जनार्दन चाळ,विर सावरकर मार्ग,विरार (प.) यांनी दि. २१/११/२०२३ रोजी सायंकाळच्या दरम्यान आपली बजाज कंपनीची पल्सर मोटर सायकल रुम नं.०२, येसुबाई जनार्दन चाळ,विर सावरकर मार्ग,विरार (प.) इथे उभी करुन ठेवलेली असतांना कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करुन नेली याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारी वरुन आरोपी विरुध्द विरार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या अनुषंगाने विरार गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळी जावून सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदार यांच्याकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी १) स्वतिक सिंग,वय -२१ वर्ष,२)अखिल शेख,वय-२१ वर्ष,३)आशिष लक्ष्मण जाधव,सर्व राहणार- विरार (प.)ता.वसई,यांस दि.२९-११-२०२३ रोजी ताब्यात घेवुन तपास केला असता वरिल गुन्ह्यात त्यांचा सहभाग निष्पन्न झाला असुन पोलीसांनी आरोपींना अटक केली असुन अधिक तपास केला असता त्यांच्याकडुन ०२ पल्सर मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या असुन आरोपी यांनी वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडीचा गुन्हा केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकारे पोलीसांनी १)विरार,२) वसई ,३)बोईसर, येथील एकुण ०३ गुन्ह्यांची उकल केली आहे.
सदरची कामगिरी श्री.सुहास बावचे,पोलीस उप आयुक्त सो,परीमंडळ-3,विरार,श्री. रामचंद्र देशमुख,सहायक पोलीस आयुक्त सो,विरार विभाग,यांच्या मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाणेचे श्री.राजेंद्र कांबळे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो.श्री. अभिजित मडके, पोलीस निरीक्षक(गुन्हे),व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.उप.निरी.ज्ञानेश्वर कोकाटे,पो.हवा.सचिन लोखंडे,संदिप जाधव,विशाल लोहार, इंद्रनिल पाटील,संदिप शेरमाळे,पो.अं.संदिप शेळके,सचिन बळीद,बालाजी गायकवाड,रोशन पुरकर,दत्तात्रय जाधव,प्रफुल्ल सोनार यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
