वसई : ॲल्युमिनीअमचा स्क्रॅप माल विक्री करीता असल्याबाबत तसेच खोटे नांव सांगुन फसवणुक करणा-या टोळीला अटक करुन त्यांच्याकडून एकुण २०,०२,३३२/- रु.किमतीचा मुददेमाल रोख रक्कमेसह हस्तगत. अधिक माहितीनुसार श्री.जगदिश सरदारमल सुतार वय ३० वर्षे, व्यवसाय. ट्रेडींग रा भावनगर, राज्य गुजरात हे ॲल्युमिनीअम स्क्रॅपचे व्यापारी आहेत. ते भारतातील अनेक राज्यांमधुन मध्यस्थांच्या मार्फत स्क्रॅप विकत घेत असतात. या गुन्हयातील आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधुन मेढे गांव ता. वसई जिल्हा पालघर या ठिकाणी मोठया प्रमाणावर स्क्रॅप उपलब्ध असल्याचे सांगुन तक्रारदार यांना स्क्रॅप घेण्यासाठी बोलावुन घेतले व सागर मेटल या कंपनीची व जीएसटी नंबरची माहीती देवुन व्यापा-यांचा (तक्रारदाराचा) विश्वास संपादन केला.यातील आरोपींनी ते स्वता भंगार मालाचे व्यवसायीक व एजंट आहेत असे भासवले आणि व्यापा -याला मेढे येथे बोलावुन २७,८७,२३६/- रुपये किंमतीचा १५ टन ॲल्युमिनीअम स्क्रॅप माल मिळवुन देण्याचे ठरविले. हा भंगार माल मेढे येथील गुरुकृपा रिअलकॉन कंपनी यांच्याकडुन विकत घेण्याचे ठरले. या कंपनीच्या मालकाचा सुध्दा विश्वास संपादन करण्यात आला. १५७ रुपये किलो या दराने २७,८७,२३६/- रुपये दराचा माल खरेदी करण्यात आला व व्यापा-यासाठी ट्रक बोलावुन त्यामध्ये माल भरण्यात आला. मालाची डिलीवरी करण्याआधी व्यापा-याकडुन जीएसटी सह वरील सर्व रक्कम सागर मेटल या कंपनीच्या नावावर ट्रान्सफर करुन घेण्यात आली. पैसे अकाऊंटवर जमा झाल्यावर माल भरलेला ट्रक ताब्यात देण्यात येईल व दुकानदाराचे पैसे सुध्दा देण्यात येतील असे सांगुन आरोपी हे त्यांनी आणलेल्या स्विफ्ट गाडीमधुन पळुन गेले. आरोपींनी त्यांच्य अकाऊंटवर आलेले पैसे तात्काळ इतर खात्यांमध्ये ट्रान्सफर करुन स्वतःचे मोबाईल नंबर बंद केले.आपली फसवणुक झाली आहे असे लक्षात आल्यावर तक्रारदार हे पोलीस स्टेशनमध्ये आले त्याच्या तक्रारीवरुन दिनांक. २८/१०/२०२१३ रोजी मांडवी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर लागलीच बँकेचे खाते गोठविण्यात आले. तांत्रिक तपासामध्ये आरोपी हे कल्यण शिळफाटा येथे असल्याची माहीती पोलिसांना प्राप्त झाल्याने गुन्हे शाखा कल्यण यांच्या मदतीने ३ आरोपींना गाडीसह ताब्यात घेण्यात आले. त्याच्यकडे चौकशी करुन चौथ्या आरोपीचे नांव निष्पन्न करण्यात आले. चौथा आरोपी हा मुंबई वाराणसी ट्रेनने उत्तर प्रदेश येथे जाण्यास निघाला होता. ट्रेनची वेळ आणि तीने कापलेले अंतर याचे विश्लेषण करुन जीआरपीएफ यांच्या मदतीने आरोपीला चालत्या ट्रेनमधुन नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे पोलिसांनी ताब्यात घेतले . सर्व आरोपी हे उत्तर भारतीय असुन,गुन्हयात सहभागी असलेले १) अशोककुमार डलाराम प्रजापती वय ३५ वर्षे, व्यवसाय. स्क्रॅप माल विक्री रा. ओम साई अपार्टमेंट ,जुहुगांव, वाशी, नवी मुंबई,२) ओमप्रकाश रामविलास शुक्ला वय ५० वर्षे, धंदा. भंगार विक्री रा. लोकमान्यननगर पाडा नं. ३ फर्नांडीस यांची रुम ठाणे पुर्व ता. जि. ठाणे,.३) धर्मेंद्रकुमार बबन सिंग वय ४५ वर्षे, व्यवसाय. भंगार विक्री रा. सांमारवाडी गाडून सिटी जवळ, जितुभाई चाळ, रुम नं. ६ दुसरा मजला सिल्वासा, वापी गुजरात ४) साहाबुददीन मोईनुददीन खान वय ६० वर्षे, व्यवसाय. दलाली रा. रुम नं.०१, म्हाडा कंपाऊंड खोपोली फाटा, ता. खोपोली जिल्हा. रायगड ,यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये, त्यांनी कळंबोली, खारघर, तळोजा, धुळे, औरंगाबाद, दिल्ली या ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी हे २०१७ पासुन टोळीने अशाच प्रकारचे गुन्हे करत असल्याची माहीती समोर आलेली आहे.
आरोपी हे प्रत्येक वेळेस स्वताची नावे, मोबाईल नंबर आणि मोबाईल बदलत असतात आरोपींकडुन १५ मोबाईल,२ स्टॅम्प,१ स्टॅम्प पॅड, ४ मोबाईल बॅटरी, वेगवेगळया बँकेचे १० एटीएम कार्ड, ३ चेक बुक, १ मोबाईल चार्जर, ४ सिमकार्ड, घडयाळ, आधारकार्ड, पॅनकार्ड, तसेच आरोपींच्या ताब्यातील स्विप्ट कार, तसेच फिर्यादीची फसवणुक केलेली रोख रक्कम असा एकुण २०,०२,३३२/- रुपये किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी मा.श्री.सुहास बावचे, पोलीस उप-आयुक्त सो, परिमंडळ – ३ विरार, मा.श्री.रामचंद्र देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त, विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री. प्रफुल्ल वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. अशोक कांबळे, पोलीस निरिक्षक (गुन्हे), पो.उप निरी. चंद्रकांत पाटील, पो.हवा. राजेंद्र फड, तरवारे, पो. अं. संभाजी लोधे, पो. गणेश ढमके, अमोल साळुंखे नेमणुक मांडवी पोलीस ठाणे, पो.अं.ढोणे, सोहेल शेख, नेमणुक – पो.उप. आयुक्त परि.३ विरार, स.फौ. काश्मिरी सिंग, नेमणुक आरपीएफ यांनी यशस्वीरित्या पार केली आहे.
