नायगाव : फसवणुकीचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगारास आचोळे पोलीसांनी केली अटक. अधिक माहितीनुसार आचोळे पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यांतील फरार आरोपी अजित दयाशंकर मिश्रा रा. अंजठा बिल्डीग बी विंग रुम नं ३०४, डॉन बास्को स्कुल जवळ, नायगांव पुर्व व चालक अजय अंकुश गायकर वय ३९ वर्षे रा. साई सावळी चाळ रुम नं ०५, गणेशनगर नायगाव पुर्व हा नायगाव पुर्व डॉन बास्को स्कुल जवळ, अंजठा बिल्डीग मध्ये राहत असल्याची गुन्हयाचे तपासी अधिकारी पोउपनि / रेखा पाटील यांना गुप्त बातमीदार यांच्याकडून माहिती मिळाल्याने सदरची माहीती त्यांनी वपोनि / पवार यांना कळविली व सदर आरोपी याचा शोध घेण्यासाठी पोउपनि / रेखा पाटील सोबत पोकॉ/ शिवराम शिंदे मसबु कर्मचारी/आव्हाड, मसुब / खवले हे रवाना झाले.
आरोपी यांना पोलीसांची चाहुल लागल्यावर स्वतःची अटक चुकविण्यासाठी आरोपी अजित दयाशंकर मिश्रा हा त्याच्या इनोव्हा क्रिस्टा गाडीमधुन पळुन जाण्याच्या तयारी असतांना पोलीस पथकास दिसल्याने पोलीसांनी आरोपीची गाडी थांबवुन आरोपी यांचेशी बोलत असतांना तपासी अधिकारी यांना आरोपी याने जिवे मारण्याची दमदाटी करुन पुन्हा गाडीमधुन पळुन जात असतांना पोलीस पथकामील अंमलदार यांना गाडीने जिवे मारण्याचा प्रयत्न केला असता प्रसंगावधान दाखवुन पथकातील अंमलदार बाजुला होवून सोसायटीचे गेट बंद केल्याने आरोपीची गाडी बंद पडल्याने मोठ्या परिश्रमाने सराईत आरोपीस यशस्वीपणे पोलीसांनी ताब्यात घेवुन अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास मपोउपनि / रेखा पाटील हया करीत आहोत. सदर आरोपी व त्याच्या चालकावर नायगांव पोलीस ठाणे येथे मपोउपनि / रेखा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा सराईत असुन त्याच्या अश्या प्रकारचे एकूण ५ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी श्रीमती पौर्णिमा चौगुले – श्रींगी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२ वसई, श्री. विनायक नरळे, सहा.पोलीस आयुक्त, तुळींज विभाग, श्री. बाळासाहेब रा. पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आचोळे पोलीस ठाणे, पोनि / विवेक सोनवणे, (गुन्हे), यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि / रेखा पाटील, व पोकॉ/ शिवराम शिंदे मसबु कर्मचारी / आव्हाड, मसुब / खवले यांनी केली आहे.
