मिरारोड : Electricity Bill तात्काळ भरण्याचे सांगून बनावट लिंकद्वारे फसवणूक झालेल्या तक्रारदाराचं १,००,००० /- रुपये परत मिळविण्यात यश सायबर गुन्हे कक्षाची कामगिरी. अधिक माहितीनुसार मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे श्री. रविंद्रन वासुदेवन वाझाल रा. मिरारोड पुर्व यांना त्यांच्या मोबाईलवर मसेज आला होता की,लाईट बिल भरले नसल्याने तात्काळ कनेक्शन कट करणार असल्याचे नमुद केले होते. तसेच लाईट कनेक्शन चालु ठेवण्याकरीता मॅसेजमध्ये एक मोबाईल क्रमांक नमुद करुन त्यावर संपर्क करण्याबाबत कळविले होते. तक्रारदार यांची सदर मोबाईल क्रमांकवर फोन केला असता अनोळखी मोबाईल धारकाने फोन उचलुन तक्रारदार यांच्या मोबाईलवर पाठविलेल्या लिंकमध्ये ऑनलाईन बिल भरण्यास सांगितले. तक्रारदार यांनी त्यांचे मोबाईलवर प्राप्त लिंकमध्ये माहिती भरुन पाठविली असता त्यांचे बँक खात्यातुन १,००,००० /- रु कपात झाल्याबाबत मॅसेज प्राप्त झाला.त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांची फसवणुक झाल्याबाबत सायबर गुन्हे कक्ष येथे तक्रारी अर्ज दिनांक १६/१०/२०२३ दिला होता.
या तक्रारीबाबत तात्काळ दखल घेवून सायबर कक्षाने तक्रारदार यांचे झाले व्यवहाराबाबत माहिती प्राप्तकेली व प्राप्त माहितीचे अवलोकन करून सायबर कक्षाने तक्रारदार यांचे फसवणूक रक्कमेबाबत संबंधीताना तात्काळ पत्रव्यवहार करुन तक्रारदार यांची फसवणुक झालेली पुर्ण रक्कम १,००,०००/- त्यांचे मुळ खात्यावर परत मिळविण्यात आली.
अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी…
- विज बिल भरण्याबाबत मोबाईलवर मॅसेज प्राप्त झाल्यास मॅसेजच्या अनुषंगाने कोणतीही कारवाई करु नये.
- अश्या प्रकारच्या मॅसेज प्राप्त झाल्यास संबंधीत कार्यालयात जावून खात्री करावी.
- मोबईलवर प्राप्त कोणत्याही अनोळखी लिंक किंवा फोन धारकांची खात्री झाल्याशिवाय अनोळखी व्यक्तीकडे आपले बँक खाते, जन्मदिनांक, OTP वा इतर वैयक्तीक माहीती उघड करु नये.
- कोणत्याही अनोळखी कॉल / मॅसेज आल्यास त्याची विश्वासर्हता पडताळणी करुन घ्यावी.
तसेच मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे फसवणूक करणे कायदयाने गुन्हा आहे. असा प्रकार आपल्यासोबत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी.
सदरची कामगिरी श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व. वि. पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. सुजितकुमार गुंजकर, सपोनि /स्वप्नील वाव्हळ, मपोअं/ १३०८७ अमिना पठाण, मपोअं / १६१०६ सुवर्णा माळी, यांनी पार पाडली आहे. सायबर फसवणुक हेल्पलाईन क्रमांक :- १९३०
सायबर फसवणुक हेल्पलाईन वेबसाईट :- www.cybercrime.gov.in
