रबाळे– अँटीकरप्शन अधिकारी असल्याची बतावणी करुन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी यांच्या घरी ३५ लाख रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या मोहरक्यास अटक करण्यास विरार गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश.अधिकमाहितीनुसार रबाळे पोलीस ठाण्यातील दाखल गुन्हा श्री. कांतीलाल यादव, वय – ६० वर्षे, व्यवसाय – सेवानिवृत्त, रा. ऐरोली, नवी मुंबई यांचे राहते घरी दि.२१/०७/२०२३ रोजी दुपारच्या दरम्यान ०६ अनोळखी इसम आले व ते अँटीकरप्शन अधिकारी आहेत हे भासवून त्यांनी घराची झडती घेण्याच्या बहाण्याने कांतीलाल यादव यांच्या घरामध्ये प्रवेश करुन, घरातील रोख रक्कम, सोन्याचे दागिने, ०२ मनगटी घड्याळे, व चामडयाची बॅग असा एकुण- ३४,८५,०००/- रु. किं.चा मुद्देमाल घेऊन फिर्यादी व त्यांच्या पत्नीस मारहाण करुन, जिवे मारण्याची धमकी देवुन,दरोडा टाकला होता. सदर बाबत रबाळे पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी तपास करुन ११ आरोपीना अटक केली होती. परंतु नमुद गुन्हयातील मोहरक्या- अमित वारिक याचा मागील ०३ महिन्यापासुन रबाळे पोलीस सातत्याने शोध घेत होते. परंतु रबाळे पोलीसांना त्यामध्ये यश येत नव्हते.
दि.२२/१०/२०२३ रोजी रबाळे पोलीसांनी सदर गुन्हयातील आरोपी हा विरार पोलीस ठाणे हद्दीत वास्तव्यास येणार असल्याची माहिती देवुन, सदर आरोपीचा शोध घेण्याचे पोलिसांना सांगितले होते त्याअनुषंगाने विरार पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी आरोपी-अमित वारिक याच्या शोधार्थ रबाळे पोलीसांकडून माहिती जमा करुन, लागलीच गुप्त त्याबाबत बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीचा मागोवा घेतला असता, त्या आधारे आरोपी. अमित संजय वारिक, वय-३५ वर्षे, रा. चंदनसार, विरार पुर्व यास चंदनसार, विरार पुर्व येथील आर. के. हॉटेल जवळ, ०२ तासांचे आत यशस्वीरित्या विरार गुन्हे प्रकटीकरण पथकाने ताब्यात घेतले .बतावणी करुन दरोडा या गुन्हयाचे गांभीर्य व संवेदनशिलता लक्षात घेवुन, मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी प्रस्तुत गुन्हयातील आरोपी अमित वारिक यास यशस्वीरित्या ०२ तासांचे आत ताब्यात घेवुन, महत्वपुर्ण कामगिरी केलेली आहे. नमुद आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन, त्याच्यावर खंडणी, फसवणुक यासारखे मुंबई, ठाणे, आयुक्तालयात अनेक गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी श्री.सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त सो, परिमंडळ – ३, विरार, श्री. रामचंद्र देशमुख, सहायक पोलीस आयुक्त सो, विरार विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाणेचे श्री. राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो, श्री. अभिजित मडके, पोलीस निरीक्षक (गुन्हे), व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि/ज्ञानेश फडतरे, पोहवा/सचिन लोखंडे, संदिप जाधव, विशाल लोहार, इंद्रनिल पाटील, संदिप शेरमाळे, योगेश नागरे, पोअं/संदिप शेळके, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, रोशन पुरकर, दत्तात्रय जाधव, प्रफुल सोनार यांनी यशस्वीरित्या पार पाडली
