वसई विरार शहर महानगरपालिकाचे चिन्हाचा वापर करून नोकरीचे बनावट ऑफर लेटर देऊन फसवणूक करणाऱ्या अटक .

Breaking News Crime News Cyber Crime Latest News Political News

वसई : आचोळे पोलीस ठाणेची कामगीरी- वसई विरार शहर महानगरपालिका यांचे अधिकृत असलेले चिन्हाचा वापर करुन नोकरीचे बनावट ऑफर लेटर देऊन फसवणुक करणा-या गुन्हेगारांना अटक. अधिक माहितीनुसार आचोळे पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामधील मधील फिर्यादी श्रीमती सुषमा अनिल विसपुते वय ४० वर्षे व्यवसाय-नोकरी रा.बी/२०५,साईभक्ती अपार्टमेंट, साईबाबा नगर, नवघर रोड, भाईंदर पूर्व ता. जि. ठाणे यांना आरोपी यांनी  आपसात संगणमत करुन फिर्यादी व साक्षीदार यांना नोकरीचे अमिष दाखवून वसई विरार शहर महानगरपालिका येथे नोकरी लावुन देतो असे सांगुन फिर्यादी व साक्षीदार त्यांच्याकडून  पैसे घेवुन शासनाचे संबंधित वसई विरार शहर महानगरपालिका यांचे अधिकृत असलेले चिन्हाचा वापर करुन नोकरीचचे बनावट ऑफर लेटर तयार करुन विशेष अधिकारी, पालघर यांचा राजमुद्रीत गोल शिक्का मारुन बनावट दस्तऐवज तयार करुन फसवणुक केली याबाबत दिलेल्या  फिर्यादीवरुन आचोळे पोलीस ठाणे येथे गुन्हा  नोंद करण्यात आला आहे

सदर गुन्हयांबाबत मा.वरीष्ठांनी गंभीर दखल घेवुन आरोपी यांना अटक करण्याच्या  सुचना दिल्या  होत्या. गुन्हयांतील आरोपी यांची काहीही माहिती नसताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे  यांचा शोध घेवुन  १) विजय गंगाराम जाधव वय ३३ वर्षे रा. रुम नं.१०१, फेज नं. ०१, चंद्रेश हेरिटेज, संयुक्तनगर नालासोपारा पुर्व ता.वसई जि. पालघर २) सुरज रघुनाथ जाधव वय ३१ वर्षे रा. रुम नं. १३, सिद्धेश्वर चाळ, नगीनदास पाडा नालासोपारा पुर्व ता.वसई जि. पालघर ३) महेश रविद्र जाधव वय २७ वर्षे रा. रुम नं. १०१, नवदुर्गा बिल्डींग नं.५, नगीनदास पाडा नालासोपारा पुर्व ता. वसई जि. पालघर यांना दिनांक १७/१०/२०२३ रोजी अटक करण्यात आली आहे.नमुद गुन्ह्यातील अटक आरोपी यांनी आपसात संगणमत करुन फिर्यादी व साक्षीदार यांना नोकरीचे अमिष दाखवुन वसई विरार शहर महानगरपालिका येथे नोकरी लावुन देतो असे सांगुन फिर्यादी व साक्षीदार यांचेकडुन पैसे घेवुन शासनाचे संबंधित वसई विरार शहर महानगरपालिका यांचे अधिकृत असलेले चिन्हाचा वापर करुन नोकरीचे बनावट ऑफर लेटर तयार करुन विशेष अधिकारी, पालघर यांचा राजमुद्रीत गोल शिक्का मारुन बनावट दस्तऐवज तयार करुन फसवणुक केली आहे. गुन्हयांच्या तपासात आता पर्यंत  फिर्यादी यांचेसह एकुण १० लोकांची फसवणुक केलेचे निष्पन्न झाले असुन आरोपी यांनी आणखी काही लोकांची फसवणुक केल्याची  शक्यता आहे.

सदरची कामगिरी मा.श्रीमती पोर्णिमा चौघुले – श्रींगी, पोलीस उप आयुक्त सो. परीमंडळ – २ वसई, श्री. विनायक नरळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सो. तुळींज विभाग, यांच्या  मार्गदर्शनाखाली आचोळे पोलीस ठाणेचे श्री. बाळासाहेब पवार वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. विवेक सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पोलीस उपनिरीक्षक रेखा पाटील, पो. अं. शिवराम शिंदे यांनी केली आहे.

Police Batmi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *