सायबर कक्षास क्रेडटि कार्ड च्या द्वारे झालेली लाखो रुपयांची रक्कम परत करण्यात यश .

Breaking News Crime News Cyber Crime Latest News Political News

मिरारोड : Credit Card द्वारे फसवणूक रक्कम रु. ३,१४,७६१/- परत करण्यात सायबर गुन्हे कक्षास यश. अधिक माहितीनुसार मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नयानगर परिसरातील श्री. बाबुराज आचार्य हे त्यांच्या  आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड च्या कस्टमर केअरचा क्रमांक ऑनलाईन सर्च करीत होते. तक्रारदार यांना काही वेळानंतर अनोळखी मोबाईल धारकाचा फोन आला व त्याने आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड विभागातुन बोलत असल्याचे सांगितले. बाबुराज आचार्य  यांनी त्यांच्या  अडचणीबाबत सांगितले असता अनोळखी इसमाने तक्रारदार यांना क्विक सपोर्ट अँप डाऊनलोड करण्यास सांगून . त्यानंतर तक्रारदार यांच्या  खात्यातुन एकुण ४,१९,०००/- रु कपात झाल्याचा मॅसेज त्यांना प्राप्त झाला. सदरबाबत सायबर गुन्हे कक्ष येथे दि.१९/०८/२०२३तक्रारी अर्ज प्राप्त करण्यात आलेला होता.

नमूद तक्रारीबाबत तात्काळ दखल घेवून सायबर कक्षाने तक्रारदार यांच्या झालेल्या  व्यवहाराबाबत माहिती प्राप्त केली. व प्राप्त माहितीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांच्या  फसवणूक रक्कमेबाबत संबंधीताना तात्काळ पत्रव्यवहार करुन रक्कमेपैकी ३,१४,७६१/- रक्कम त्यांचे मुळ खात्यावर परत करत आली.

सायबर कक्षाने अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी घेण्याची काळजी बाबत सांगितले आहे.

  • Credit Card संदर्भातील माहिती कोणाकडेही उघड करू नये
  • आपले बँक खाते, जन्मदिनांक, OTP वा इतर वैयक्तीक माहीती देवू नये.
  • आपले मोबाईल फोन मध्ये कोणतेही अनोळखी अॅप डाऊनलोड करु नये.
  • फसव्या एमएसएसला, कॉल प्रतिसाद देवू नका.
  • क्रेडीट कार्ड, डेबिट कार्डद्वारे इंटरनॅशनल ट्रॅन्झॅक्शन झाल्यास तात्काळ बँकेला संपर्क करावा.

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात आले कि , अशा प्रकारे फसवणूक करणे कायदयाने गुन्हा आहे. असा प्रकार आपल्यासोबत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी.

सदरची कामगिरी श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व. वि. पोलीस आयुक्तालय यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. सुजितकुमार गुंजकर, स.पो.नि.स्वप्नील वाव्हळ, म.पो. अं. अमिना पठाण, सुवर्णा माळी, पो.अं. कुणाल सावळे, यांनी पार पाडली आहे.

सायबर फसवणुक हेल्पलाईन क्रमांक :- १९३०

सायबर फसवणुक हेल्पलाईन वेबसाईट :- www.cybercrime.gov.in

Police Batmi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *