मिरा रोड – फेसबुक वरील बनवाट जीओ मार्ट पेजवर ऑनलाईल शॉपिंग करत असतांनाANY DESK एप्लीकेशन डाऊनलोड करण्यास भाग पाडुन तक्रारदार यांचेकडुन ओटीपी प्राप्त करुन ८०,०००/- रुपयांची फसवणुक झालेले पैसे परत मिळविण्यात काशिमीरा पोलीस स्टेशनला यश.
मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत मिरा रोड पूर्व येथे राहणारे श्री सतिश सोलंकी, हे दिनांक २६/०९/२०२३ रोजी फेसबुकवर जिओ मार्ट या एप्लीकेशनवर शॉपिंग केल्यावर मोठया प्रमाणात डिस्काउंट भेटत असल्याची जाहिरात पाहून तक्रारदार यांनी सदर फेसबुक पेजवरील लिंक वर जावून स्वताच्या बॅकेचे क्रेडिट कार्डचे डिटेल्स व वैयक्तिक माहिती भरल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर अनोळखी इसमाने जिओ मार्टची बनवाट लिंकच्या नावाखाली ANY DESK हे एप्लीकेशन पाठूवन ते डाऊनलोड करण्यास भाग पाडले.व त्यानंतर तक्रारदार यांच्या क्रेडीट कार्ड मधून एकुण ८०,००० /- रुपये डेबिट होवुन तक्रारदार यांची फसवणुक केली .
त्यानंतर तक्रारदार यांनी लागलीच दोन तासाच्या आतच काशिमीरा पोलीस ठाणे येथे तक्रारी अर्ज दिला होता. त्यानंतर दिनांक – २६/०९/२०२३ रोजी तक्रार पोलीस निरीक्षक/ सोनवणे यांच्याकडे प्राप्त झाली.
‘ नमूद तक्रारी बाबत वपोनि. श्री. संदीप कदम, पोलीस निरीक्षक श्री. राहुल सोनवणे व पोलीस उप निरीक्षक श्री. वैभव धनावडे यांनी तात्काळ दखल घेवून तक्रारदार यांचा झालेल्या व्यवहाराबाबत माहिती प्राप्त केली. त्याचे अवलोकन केले असता तक्रारदार यांची फसवणूक झालेली ८०,००० /- रुपये रक्कम हि प्रथम Chroma digital या अॅपवर digital Gift Vouchers विकत घेतल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले. नमुद Chroma digital यांचे नोडल अधिकारी यांना पोलीस निरीक्षक / राहुल सोनवणे यांनी तात्काळ मेल करुन सदरचे ट्रक्शन व्यवहार थांबविण्याबाबत कळविले होते.
त्यानंतर Chroma digital यांनी सदरची Gift Vouchers हे कॅन्सल करुन सदरची रक्कम हि तात्काळ गोठविण्यात आली. त्यानंतर Chroma digital यांनी ८०,००० /- रुपये रक्कम हि तक्रारदार यांचे खात्यात जमा केली.
- पोलिसांनी अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी कशी काळजी घ्यावी हे सांगितले…
- अशा प्रकारे फसवे कॉल अथवा एसएसएस प्राप्त झाल्यास त्यावर कोणताही प्रतिसाद देवू नये.
- आपल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त होणारे एसएमएस, ईमेल, कॉल्स यांची विश्वासहर्ता ची पडताळणी करावी. आपले मोबाईलवर प्राप्त होणारा OTP किंवा आपली वैयक्तीक माहिती देवू नये.
तसेच फसवणुक झाल्याचे लक्षात येताच लागलीच नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा जेणेकरुन Golden Hour Period मध्ये फसवणुक झालेली रक्कम परत मिळविण्याकरीता मदत होईल.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे फसवणूक करणे कायदयाने गुन्हा आहे. असे कृत्य कोणी करीत असल्याचे आढळुन आल्यास तात्काळ
नजीकच्या पोलीस ठाणेस, तसेच सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी.
सदरची कामगिरी श्री.जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १, विरार, श्री. महेश तरडे, सहा. पोलीसआयुक्त मिरा रोड विभाग मि. भा.व.वि. पोलीस आयुक्तालय व वरिष्ठ पोलीस निरीक्षक / श्री संदिप कदम यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक / वैभव धनावडे यांनी पार पाडली आहे.
