विरार : संयुक्त अरब अमिरात व अमेरीकेचे चलन स्वस्तामध्ये देण्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेण्यात गुन्हे शाखा कक्ष -३ विरार यांना यश, अधिक माहितीनुसार दि. ०४.१०.२०२३ रोजी १०.०० ते ११.०० दरम्यान दत्त मंदीर समोर विरार प. ता. वसई जि. पालघर येथे फिर्यादी वय ६४ वर्षे, यांचा विश्वास संपादन करुन आरोपी यांनी संयुक्त अरब अमिरात व अमेरीकेचे चलन स्वस्तामध्ये देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून एकुण ४,००,०००/- रुपये रोख रक्कम त्यात ५०० रु. चे नोटा घेवुन हातचलाखीने त्यांच्याकडील कागदाच्या नोटाचे आकाराचे बंडल करुन एका सफेद रंगाच्या रुमालामध्ये गुंडाळुन फिर्यादी यांना देवुन फसवणुक केली म्हणुन विरार पोलीस ठाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
त्याअनुषंगाने मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी दिलेल्या सुचना व आदेशान्वये सदर गुन्हयाचा समांतर तपास पोलीस करीत असतांना तांत्रीक विश्लेषण व आरोपी बाबत मिळालेल्या गोपणीय बातमीवरून आरोपी (१) अख्तर रज्जाक चौधरी वय ५५ वर्षे, (२) सागर रहीम हलदर, वय ४५ वर्षे, (३) तहुरन गुलामरसुल शेख, वय ५२ वर्षे, सध्या (४) फातीमा बेगम मुशर्रफ शेख, वय २७ वर्षे, यांना दिनांक ०९/१०/२०२३ रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांचे कडुन रोख रक्कम, संयुक्त अरब अमिरातचे (परकीय चलन), मोबाईल फोन असा १,४१,५००/- रुपये किंमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतला आहे
नमुद आरोपी हे मुळचे बांगलादेशी नागरीक असुन ते बेकायदेशीरीत्या भारतामध्ये वास्तव्य करीत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न होत असुन सदर आरोपी हे प्रथम फिर्यादी यांच्याशी ओळख करुन त्यांच्याकडे संयुक्त अरब अमिरात आणि अमेरीकेचे चलन (डॉलर) असल्याचे सांगून ते भारतीय रुपयांच्या बदल्यात कमी किमतीमध्ये फिर्यादी यांना देण्याचे अमिष दाखवुन फिर्यादी यांचे कडुन त्यामोबदल्यात पैसे घेवुन फिर्यादी यांना हातचलाखीने हातरुमालात गुंडाळलेली रद्दी पेपर देवुन फसवणुक केली असे पोलीस तपासात उघड झाले.
नमुद आरोपी यांनी दिनांक ०३/१०/२०२३ रोजी सांताक्रूज पुर्व परिसरत अशाच प्रकारे एक इसमाची एक लाख रुपयाची फसवणुक केल्याची माहिती समोर आली असून , आरोपी यांना पुढील कारवाई करीता विरार पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे.
वरील कामगिरी श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त सो., (गुन्हे), श्री. अमोल मांडवे सहा.पोलीस आयुक्त सो., (गुन्हे) मि. भा. वि. व पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. प्रमोद बडाख, पो.उप निरी. अभिजीत टेलर, उमेश भागवत, पो.हवा. अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारवकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, पो.अं. राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, म.सु. ब. प्रविण वानखेडे, तसेच महिला म.सु. ब. मयुरी अनारसे नेम नालासोपारा पोलीस ठाणे व स.फौ. संतोष चव्हाण नेम सायबर सेल यांनी पार पाडली आहे.
