औरंगाबाद येथे एक्साईड कंपनीच्या रुपये १४ लाखाच्या बॅटरी असेलला कंटेनर चोरी करणाऱ्या आरोपीस मालासह वालिव पोलिसांनी केली अटक.

Breaking News Crime News Cyber Crime Latest News

वालीव :औरंगाबाद येथे एक्साईड कंपनीच्या बॅटरी असलेला कंटेनर प्रवासादरम्यान अपहार करणाऱ्या गुन्हयातील आरोपीस रु. १४,४१,२१०/- किंमतीच्या मालासह अटक. वालीव पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटिकरण शाखेला यश. अधिक माहितीनुसार वालीव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ०२.१०.२०२३ रोजी पोलिसांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली होती कि बोयदा पाडा नाका ते राजीवली गाव बाजुकडे जाणारे रोडवरील राजप्रभा इंडस्ट्रिजसमोर एक रिक्षावाला त्याच्या रिक्षातुन चोरीच्या बऱ्याच बॅटऱ्या विक्रीकरीता घेऊन येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे .शहानिशा करुन कायदेशिर कारवाई ककरण्याचे  मा. प्रभारी अधिकारी, वालीव पोलीस ठाणे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स.पो.नि. सचिन सानप व पथकास आदेश दिले. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुप्त बामतीदाराच्या मदतीने आरोपी ना नवीन सुरज कामटी, वय २९ वर्षे, धंदा- चालक, रा. मु. रेंज ऑफिस, गणेश वरखंडे बंगल्यामागे, वसई पुर्व, जि. पालघर, मुळगाव मु. कुसराही शिपोल, पो. गोरखा, ता. घनश्यामपुर, जि. दरभंगा राज्य : बिहार यास सापळा रचुन शिताफीने त्याच्याकडील रिक्षासह ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्या  रिक्षामध्ये एक्साईड कंपनीच्या ०९ नविन बॅटरी मिळुन आल्याने त्याच्याकडे अधिक तपास करता एक्साईड कंपनीच्या एकुण १५४५ बॅटरी असा एकुण रु. १४,४१,२१०/- किंमतीचा माल मिळुन आल्याने वालीव पोलीस ठाणे येथे अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. सदर माल कोठुन चोरी झाला आहे याबाबत माहीती घेता शिवुर पोलीस ठाणे, औरंगाबाद ग्रामीण येथे हा गुन्हा दाखल असल्याची माहीती पोलिसांना प्राप्त झाली .

हि  कामगीरी श्रीमती पणिमा श्रींगी – चौगुले, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ २, श्री. विनायक नरळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग, वालीव पोलीस ठाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जयराज रणवरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. सैय्यद जिलानी यांच्या  मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण अधिकारी स.पो.नि. सचिन सानप,पो.ह. मुकेश पवार, मनोज मोरे, सचिन दोरकर, सतीश गांगुर्डे, बाळु कुटे, पो.शि. विनायक राऊत, अभिजीत गढरी यांनी यशस्वीरित्या केली

Police Batmi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *