अट्टल मोटार साईकाल चोरास अटक ५ गुन्हे उघडकीस.

Breaking News Crime News Cyber Crime Latest News Political News

नालासोपारा : चोरी व मोटार सायकल चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करुन चोरीच्या ४ मोटार सायकली व रोख रक्कम हस्तगत करुन ५ गुन्हांची उकल नालासोपारा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगीरी .अधिक माहितीनुसार नालासोपारा पश्चिमेस, चक्रेश्वर तलाव, गेट नंबर १ येथे दि २१/०९/२०२३ रोजी  विनोद जयदेव दास, वय २६ वर्षे, रा. रु.नं. डी / २०१, गुलमोहर हेरीटेज, फनफिएस्टा थिएटर जवळ, नालासोपारा पश्चिम, यांनी त्यांची निळया रंगाची ऍक्टिवा  स्कुटर  ही गणपती विसर्जनाचे वेळी पार्क करुन ठेवली होती त्यावेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची  मोटार स्कुटर चोरी करुन नेली . याबाबत त्यांनी दिलेल्या  फिर्यादीवरुन नालासोपारा पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

तसेच नालासोपारा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासुन मोटारसायकल चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने वरिष्ठांच्या  सुचनांप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचा तपास सुरु केला. गुप्त बातीमदाराकडून मिळालेल्या बातमीच्या आधारे आरोपी  सल्लाउद्दीन उर्फ सल्ला हादीश खान, वय २७ वर्षे, रा.रु.नं.सी/२०१, जास्मीन बिल्डींग, बैतुलनसर, नालासोपारा (प), ता. वसई, जि. पालघर यास ताब्यात घेवुन त्याचेकडे विचारपुस केली असतात्यानेच हा  गुन्हा केल्याचे  निष्पन्न झाल्याने त्यास दिनांक २२/०९/२०२३ रोजी पोलिसांनी अटक केली . त्याचप्रमाणे आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याने नालासोपारा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये मागील काही  दिवसामध्ये ४ मोटार सायकल चोरी केल्याचे तपासात उघड झाले असून त्याचेकडून गुन्हयात चोरीस गेलेल्या ४ मोटारसायकली हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. व  श्रीप्रस्था येथील एच. पी. पेट्रोल पंपाच्या  ऑफीस मधून चोरलेली बॅग व रोख रक्कम असा एकूण २,१५,३००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.तसेच या आरोपीवर  प्राण्यांना क्रूरतेने वागवण्याच्या प्रतिबंध  कायद्या अंतर्गत या गुन्हयात नालासोपारा पोलीस ठाणे पाहीजे आरोपी आहे.

सदरची कामगिरी श्री. सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ०३, राजेंद्र मोकाशी, सहा. पो. आयुक्त नालासोपारा विभाग यांच्या  मार्गदर्शनाखाली विजयसिंह बागल, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे, सचिन कोतमिरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), स.पो.नि. पंडीत मस्के, अमोल तळेकर, पो. हवा. किशोर धनु, हिरालाल निकुंभ, प्रशांत साळुंके, पो.ना. अमोल तटकरे, पो. अं. कल्याण बाचकर, राजेश नाटुलकर, प्रेम घोडेराव यांनी केलेली आहे.

Police Batmi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *