पालघर – स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचेकडून अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्याऱ्या आरोपीवर कारवाई. अधिक माहीतीनुसार दिनांक ०४/०९/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक श्री. अनिल विभुते स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांना बातमीदारकडुन मौजे कुडुस प्रगतीगनर ता. वाडा जि.पालघर डी – ३ बिल्डींगमध्ये दोन गाळयात तंबाखुजन्य पदार्थ विक्रीसाठी बाळगत असल्याबाबतची माहिती प्राप्त झाली होती.
सदर माहिती प्राप्त होताच श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. अनिल विभुते स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी पोउपनि / स्वप्नील सावंतदेसाई, नेम. स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांचे पथक तयार केले. सदर पथकाने वरील नमुद ठिकाणी छापा टाकला असता आरोपी ईदरीस युनुसभाई काचलिया वय २४ वर्षे, याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडून खालील प्रमाणे मुददेमाल मिळून आला.
१) १,७४,२४०/- रुपये कि.चे विमल पान मसाला एकुण ०४ खाकी रंगाच्या मोठ्या गोण्या.
२)१९,३६०/-रुपये कि.चे व्ही वन टोबॅको असे लिहलेला एकुण ०४ निळ्या रंगाच्या मोठ्या गोण्या. ३)९२४०/- रू. किंमतीचा प्रीमिअम जेड एल ०१ जाफरणी जर्दा पांढया रंगाच्या ०८ छोट्या गोणी. ४)२,८५,१२०/- रू. किंमतीचे प्रीमिअम राज निवास सुगंधी पान मसाला गुलाबी रंगाच्या ०६ मोठ्या गोण्या.५)१,७२,८००/-रू. किंमतीचे रोकडा पान मसाल्याच्या ०४ पांढऱ्या रंगाच्या मोठ्या गोण्या त्यात प्रत्येकी ०६ पांढऱ्या छोट्या गोण्या .६) ५४००/- रू. किंमतीचे बंदर चिविंग टोबॅको ०३ पांढऱ्या रंगाच्या छोट्या गोण्या .७) १२,०००/- रु कि.केसरयुक्त विमल पान मसाल्याच्या एकुण ०२ पांढऱ्या रंगाच्या गोण्या.८) ४५००/- रूपये कि.चे व्ही वन टोबॅकोचे एकुण ३ पांढया रंगाच्या गोण्या.९) १,७२,८००/- रु किंमतीचे प्रीमिअम राज निवास सुगंधी पान मसाला राखाडी रंगाच्या ०३ मोठ्या गोण्या.१०) ३३,६००/- रू. किंमतीचे प्रीमिअम राज निवास सुगंधी पान मसाला ०७ पांढया रंगाच्या छोट्या गोण्या.११) ६५,४५०/-रु. किमतीचे केसर युक्त पान मसाला ०२ मोठ्या खाकी गोण्या.१२) ११,५५०/- रु किमतीचे व्ही वन टोबॅकोच्या पांढऱ्या रंगाच्या ०७ गोण्या.१३) ४८,०००/-रू. कि.केसरयुक्त विमल पान मसाल्याच्या एकुण ०२ खाकी रंगाच्या गोण्या. १४) १२,०००/- रू. कि. चे व्ही वन टोबॅकोचे एकुण ०२ पांढऱ्या रंगाच्या गोण्या.१५) ८४००/- रू. किंमतीचा प्रीमिअम जेड एल ०१ जाफरणी जर्दा पांढऱ्या ०७ गोण्या.१६) २१,१२०/- रु. किंमतीचा प्रीमिअम जेड एल ०१ जाफरणी जर्दा ०४ मोठ्या पांढऱ्या गोणीत.१७) १३,५००/- रु. किंमतीचा राजश्री पान मसाल्याच्या हिरव्या रंगाच्या दोन गोण्या.१८) १,००,९८०/- रु किंमतीचे प्रीमिअम राज निवास सुगंधी पान मसाला खाकी रंगाच्या ०३ मोठ्या गोण्या.१९) ११,२२०/- रु. किंमतीचा प्रीमिअम जेड एल ०१ जाफरणी जर्दा ०८ मोठ्या पांढऱ्या गोणीत.२०) १९,५००/- रु. किंमतीचा केसर युक्त विमल पान मसाला असलेल्या पांढऱ्या रंगाच्या ०२ गोण्या. २१) ३९००/- रू. किंमतीचा व्ही वन टोबॅकोच्या पांढऱ्या रंगाच्या ०२ गोण्या.२२) १२,२२०/- रु. किंमतीचा केसरयुक्त विमल पान मसालाचे २६ छोटे बॉक्स असलेले. २३) ८७०/- रू. किंमतीचा व्ही वन बिग टोबॅको चे २८ छोटे बॉक्स.असा एकूण १२,१७,७७०/- किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीस अटक करून त्याच्याविरुद्ध वाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील सावंतदेसाई, नेम. स्थानिक गुन्हे शाखा, पालघर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अनिल विभुते स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, पोउपनि / स्वप्नील सावंतदेसाई, पोहवा / राकेश पाटील, पोहवा / कैलाश पाटील, पोहवा/नेमाडे, पोहवा/ सरदार, पोना / नरेश घाटाळ, पोशि/ मयुर बागल सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी यशस्विरित्या पार पाडली आहे.
