भाईंदर – पोलीस अंमलदारास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात लोखंडी रॉडने गंभीर दुखापती करुन, जबरदस्तीने मोबाईल चोरी करुन पळुन गेलेल्या आरोपीस गुन्हे प्रकटीकरण कक्ष – १ कडुन २४ तासाच्या आत अटक. अधिक माहीतीनुसार पो. हवा. जयकुमार राठोड नेमणुक मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखा मि. भा.व.वि.पो.आयुक्तालय हे दिनांक ०४/०९/२०२३ रोजी दुपारच्या दरम्यान संशयीत आरोपी हैफल कालु अली वय-२७ वर्षे रा. शिवसेना गल्ली, भाईंदर पश्चिम, ता. जि. ठाणे याच्याकडे मिरारोड पोलीस ठाणे येथे नोंद असलेल्या गुन्ह्यां संदर्भात तपास करत असतांना संशयित आरोपी यास का पकडले आहे ? या गोष्टीचा आरोपी याने राग मनात धरुन पो. हवा. जयकुमार राठोड नेमणुक मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखा मि. भा.व.वि.पो.आयुक्तालय यांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने लोखंडी रॉडने डोक्यात मारुन त्यांस गंभीर जखमी करुन त्यांच्या खिश्यातील मोबाईल फोन व पैसे खेचुन तेथुन पळुन गेला. म्हणुन त्याच्या विरुध्द फिर्यादी पो. हवा. अनिल रामदास नागरे नेमणुक मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखा, मि.भा.व.वि.पो.आयुक्तालय यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
वरील गुन्हयांची गंभीरता लक्षात घेवुन मा. पोलीस आयुक्त श्री मधुकर पांडेय तसेच मा. अपर पोलीस आयुक्त श्री श्रीकांत पाठक यांनी गुन्हे शाखेतील सर्व युनीट व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना वेगवेगळी पथके तयार करुन आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.त्याचप्रमाणे मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे अविनाश अंबुरे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे अमोल मांडवे यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या सर्व युनीटची अनेक पथके तयार करण्यात आली होती.
मा. वरीष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे गुन्हे शाखा कक्ष-०१ चे अधिकारी व अंमलदार यांचे विषेश पथक तयार करुन त्यांना सदर गुन्हयांतील आरोपी यांचा शोध घेण्याचे आदेशीत केले होते. सदर गुन्हयांतील आरोपी हैफुलअली कालुअली शेख वय-२५ सध्या फिरस्ता रा. शिवसेना गल्ली, भाईंदर पश्चिम, ता. जि. ठाणे. मुळ रा. कुतुबशहर, पोलीस ठाणे गाजौल, जिल्हा मालदा, राज्य पश्चिम हा गुन्हा करुन पळुन जात असतांना , सीसीटीव्ही फुटेज तांत्रीक विश्लेषन करीत असतांना आरोपी हा त्याचे मुळ गावी जिल्हा मालदा, पश्चिम बंगाल येथे पळुन जात असतांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनन्स, मुंबई येथे दि. ०४/०९/२०२३ रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच आरोपीची वैद्यकीय तपासणीकरुन त्यास रिपोर्ट सह मिरारोड पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.
सदरची कामगीरी मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे मा. श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप- आयुक्त गुन्हे, मा. श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त साो, गुन्हे शाखा, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष १ काशिमीरा येथील पो. नि. अविराज कुराडे, स. पो. नि. प्रशांत गांगुर्डे स. पो. निरी पुष्पराज सुर्वे, स.फौ. राजु तांबे, स. फौ संदीप शिंदे, पो.हवा.अविनाश गर्जे, संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, विजय गायकवाड, सचिन हुले, सुधिर खोत, विकास राजपुत, पो.अं.प्रशांत विसपुते, तसेच स.फौ. संतोष चव्हाण, सायबर विभाग, तसेच म.सु. ब. चे किरण आसवले तसेच गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
