विरार – बोलण्यात गुंतवून हातचालाखीने फसवणुक करणा-या सराईत आरोपीतांस ताब्यात घेण्यास गुन्हे शाखा कक्ष -3 विरार यांना यश. अधिक माहीतीनुसार दिनांक १९/०८/२०२३ रोजी सकाळच्या सुमारास साईबाबा मंदिर समोर फुलपाडा विरार पुर्व येथे दोन अनोळखी इसमांनी आपसात संगणमत करुन फिर्यादी वय – ६५ वर्षे व्यवसाय – सेवानिवृत्त, यांना, “तुम्ही चहा पिता का ” असे विचारुन त्यातील एक इसम त्यांच्या पाया पडु लागला त्यावेळी फिर्यादी त्यांस बोललो की तुम्ही कोण आहे मी तुम्हाला ओळखत नाही तेव्हा त्या व्यक्तिने त्यांच्या खिशात हात घालुन एकाने फिर्यादीच्या गळयातील सोन्याची चैन काढुन घेवुन गेले.याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन विरार पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
मिरा भाईदर वसई विरार पोलीस आयुक्तालय परिसरात गेल्या काही महिण्यापासुन बतावणी / फसवणुकीच्या प्रकारात वाढ झाल्याने सदर घटनांची मा. वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवुन आरोपी यांचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.
मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी दिलेल्या सुचना व आदेशान्वये सदर गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा कक्ष -३ कडे देण्यात आला. गुन्हयाचा तांत्रीक विश्लेषण व गुप्त बातमीदारा कडून माहिती प्राप्त करुन आरोपी १) रमेश ऊर्फ रम्या विजयकुमार जैसवाल, वय ४६ वर्षे, रा., म्हाडा कॉलनी, वाशी नाका, चेंबूर, २) विशाल ऊर्फ बल्ला ऊर्फ बाळू विष्णू कश्यप, वय २८ वर्षे, रा. सायन माहिम लींक रोड, धारावी ब्रीजच्या वर, धारावी, मुंबई. यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सदर गुन्हात दिनांक २६/०८/२०२३ रोजी अटक करण्यात आली . सदर आरोपींकडून फसवणुक केलेले १०,००,००० /- रुपये किंमतीचे १६६ ग्रॅम सोन्याचे दागीने व इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन मि. भा.व.वि. पोलीस आयुक्तालय, मुंबई शहर पोलीस आयुक्तालय, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.त्याचप्रमाणे आरोपीयांचा पुर्व इतिहास पडताळुन पाहता आरोपी विरुध्द अशाच प्रकारे मुंबई, ठाणे शहर, मिरा भाईंदर- वसई विरार आयुक्तालय येथे ५० पेक्षा जास्त गुन्हे नोंद असुन नमुद आरोपी हे विरार पोलीस ठाणे येथे नोंद असलेल्या गुन्ह्यात पोलीस कोठडी मध्ये आहेत.
वरील कामगिरी श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त सो., (गुन्हे), श्री. अमोल मांडवे सहा.पोलीस आयुक्त सो., (गुन्हे) मि. भा.वि. व पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पो.उप.निरी. अभिजित टेलर, उमेश भागवत, पो.हवा. अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे,सचिन घेरे, सागर बारवकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, पो. अं. राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे म. सु. ब सागर सोनवणे, प्रविण वानखेडे, गणेश यादव सर्व नेमणुक गुन्हे शाखा कक्ष -३ तसेच स. फौ. संतोष चव्हाण नेम सायबर सेल यांनी पार पाडली आहे.
